बागेश्वर महाराज एका प्रवचनासाठी घेतात ‘इतके’ रूपये

मुंबई | दरबारात आलेल्या भाविकांचे आपल्या दिव्यशक्तीनं आपोआप नाव ओळखणारे, एवढंच नाही तर त्या भाविकांचे वडिलांचे नाव, फोन नंबर हे सगळंही अचूक ओळखणारे बागेश्वर धाम सरकार सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहेत. आता याहून आश्चर्यकारक बाब म्हणजे हे बागेश्वर महाराज भाविकांच्या घरात कोणत्या कपाटात कोणती वस्तू ठेवलीय हेही सांगतात. त्यामुळं काहींनी त्यांच्या चमत्काराला दैवीशक्ती म्हणत त्यांना डोक्यावर घेतलय तर काहींनी याला अंधश्रद्धा म्हणत विरोध केलाय. आता या सगळ्यात बागेश्वर महराजांच्या संपत्तीचा मुद्दाही चर्चेत येतोय, त्यामुळं हे बागेश्वर धाम सरकार एका प्रवचनासाठी नेमके किती रूपये घेतात. त्यांची महिन्याची कमाई किती होते हेच आपण सविस्तर जाणून घेऊयात.

बागेश्वर महाराज यांची संपत्ती जाणून घेण्यापूर्वी आपण त्यांच्याविषयी थोडक्यात जाणून घेऊयात. बागेश्वर धाम यांचं मूळ नाव धीरेंद्र शास्री असं आहे. त्यांचा जन्म मध्यप्रदेशीमधील छतपूरजवळील गडागंज या गावात झाला आहे. याच गडागंजमध्ये बागेश्वर धाम मंदिर आहे. या बागेश्वर दरबाराता मोठ्या संख्येने भाविक समस्या घेऊन जातात आणि बागेश्वर धाम या समस्येंचं निराकरणही करतात.

नुकतंच ते नागपूरमध्येही आले होते. यावेळी बागेश्वर महाराजांनी नागपूरच्या व्यासपीठावर चमत्कार दाखवावा, असं आव्हान अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं केलं होतं. जर बागेश्वर महराजांनी या व्यासपीठावर चमत्कार दाखवला तर त्यांना ३० लाखांचं बक्षिसही देण्यात येणार होतं. परंतु हे महाराज आव्हान न स्विकारता निघून गेले आणि ज्यांना चमत्कार बघायचाय त्यांनी बागेश्वर दरबारात यावं असं त्यांनी सांगितलं. बागेश्वर धाम सरकार हे तेथून घाबरून निघून गेले असे काहींचं मत आहे.

हे बागेश्वर महाराज महाराष्ट्रातून निघून गेले खरे पण सध्या त्यांच्या छत्तीसगडमधील रायपूरमध्ये सुरू असलेल्या प्रवचनाला भाविकांनी तूफान गर्दी केलीय. एकंदरीत, बागेश्वर महाराज अंधश्रद्धा पसरवत आहेत असं म्हणत त्यांना विरोध करणाऱ्यांची संख्या कमी नाही तर दुसरीकडं त्यांच्याकडं असणाऱ्या दिव्यशक्तीला सलाम करणाऱ्यांची संख्याही कमी नाही.

आता या सगळ्यात बागेश्वर महाराजांच्या संपत्तीचीही जोरदार चर्चा होताना दिसतेय. धीरेंद्र शास्त्री एका प्रवचनासाठी ८ हजार रूपये घेतात. या महारजांची एका महिन्याची कमाई तब्बल साडेतीन लाख रूपये आहे. तर त्यांची नेटवर्थ 9 कोटी रूपये आहे. बागेश्वर धाम महाराज यांची संपत्ती ऐकून सगळ्यांनाच धक्का बसत आहे.

पण बागेश्वर महाराजांनी या संपत्तीचा उपयोग समाजकार्यसाठी केला जातोय असं सागितलंय. ते या पैशांचा उपयोग भूकेल्या लोकांना अन्न देण्यासाठी तसेच गरजूसांठी करतात. आपण एक गोशाळा देखील चालवतो अशी माहिती बागेश्वर महाराजांनी दिलीय.

महत्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More