आठवीतच शिक्षण सोडलं, झोपडपट्टीत वाढलेल्या स्टॅनच्या संपत्तीचा आकडा वाचून थक्क व्हाल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | ‘बिग बाॅस'(Big Boss) हा सगळ्यांचा फेवरेट शो आहे. रविवारी बिग बाॅस सिझन 16 चा फिनाले सोहळा पार पडला. हा सिझन प्रचंड गाजला. या फिनालेमध्ये स्पर्धकांची काट्याची टक्कर पहायला मिळाली. यावेळी शिव ठाकरे (Shiv Thackeray) आणि एमसी स्टॅन या दोघात चुरस पहायला मिळाली. अखेर रॅपर MC Stan ने विजेतापद पटकावलं. MC Stan चा इथपर्यंतचा प्रवास आणि सध्याच्या त्याच्या संपत्तीचा आकडा आर्श्चयकारक आहे.

एमसी स्टॅनचा जन्म पुण्यातील एका लहान कुंटुबात झाल्या. तो झोपडपट्टीत वाढला. एमसी स्टॅनचं मूळ नाव अल्ताफ अडवी (Altaf Advi) आहे. लहानपणापासून स्टॅनला गाण्याची आवड होती. त्यामुळे त्यानं आठवीमध्येचं शिक्षण सोडलं. तो कव्वालीदेखील म्हणायचा. त्याच्या ‘वाटा’ या गाण्यानं स्टॅनला प्रसिद्धी मिळाली. रॅपर रफ्तारसोबत देखील एमसीनं काम केलं आहे.

स्टॅनची सध्याची संपत्ती जवळपास 16 कोटी आहे. बिग बाॅसमध्ये एमसी स्टॅनचा फॅशन सेन्स (Fashion sense) चर्चेचा विषय ठरला होता. बिग बाॅसच्या घरात एमसीनं 80 हजार रुपयांचं बूट आणि दीड कोटी रुपयांची चेन गळ्यात घातली होती. या दोन्ही गोष्टीची प्रचंड चर्चा झाल्याचं पहायला मिळालं.

बिग बाॅसच्या विजेता (the winner) ठरल्यानंतर स्टॅॅनला 31 लाख 80 हजार आणि 1 कार मिळाली आहे. त्याच्या रॅपर कान्सर्टमधून (concert) स्टॅन प्रचंड कमाई करतो. त्याच्या एका काॅन्सर्टमधून त्याला कोटी रुपये मिळतात. अनेक नवीन गाणी प्रदर्शित केल्यानंतरदेखील त्याला लाखो रुपये मिळतात. स्टॅन त्याच्या रॅपमुळे प्रचंड प्रसिद्ध झाला.

दरम्यान, सध्या स्टॅनचं वय अवघं 23 वर्ष आहे. हीप-हाॅप मध्ये येण्यापूर्वी स्टॅन बीटबाॅक्सिंग (Beatboxing) आणि बी-बाॅयिंग (B-buying) करत होता. एकेकाळी स्टॅनकडे राहण्याचे देखील पैसे नसायचं. स्टॅन आपल्या कारकार्दीची सुरुवात समझो मेरी बात या गाण्यानं केली होती.

महत्त्वाच्या बातम्या