छापेमारीतून ईडीने जप्त केलेल्या मालमत्तेचा एकूण आकडा वाचून थक्क व्हाल!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडी (ED) सध्या जोरदार कारवाई करताना दिसत आहे. ईडीने भ्रष्ट व्यापारी, राजकारणी आणि अधिकाऱ्यांच्या ठिकाणांवर छापे टाकत आतापर्यंत भरपूर मालमत्ता जप्त केलीये.

अंमलबजावणी संचालनालयाने (ED) गेल्या चार वर्षांच्या तुलनेत गेल्या वर्षभरात तब्बल 505 टक्क्यांहून अधिक गुन्हे नोंदविल्याची माहिती मिळालीआहे. ईडीने 2018-19 या आर्थिक वर्षात एकूण 195 गुन्हे नोंदविले होते. 2021-22 या वर्षामध्ये 1,180 गुन्ह्यांची नोंद केली आहे. विशेष म्हणजे, केवळ गुन्हेच नाही तर छापेमारीमध्ये देखील मोठी वाढ झाल्याची माहिती आहे.

2004 ते 2014 या कालावधीत ईडीने देशभरात 112 ठिकाणी छापेमारी केली आहे. 5,346 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती.

2014 ते 2022 या कालावधीमध्ये ईडी अधिकाऱ्यांकडून देशभरात तब्बल 2,974 ठिकाणी छापेमारी करण्यात आली. या छापेमारीतून तब्बल 95 हजार 432 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-