बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बीडमधे पडला असला पाऊस, पाण्याचा लोंढा पाहून अचंबित व्हाल

बीड | संपूर्ण महाराष्ट्रात 5 दिवस अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला होता. त्यानुसार, बीड जिल्ह्यात आज मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि जिल्ह्यातील लेंढी नदी दुथडी भरुन वाहू लागल्याचं पाहायला मिळालं. येत्या 5 दिवसांमध्ये राज्यात जोरदार पावसासह गारपीट होणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला होता.

आज बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली आणि भर उन्हाळ्यात नागरिकांना पावसाचा सामना करावा लागला. दरम्यान, या पावसामध्ये शेतीमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. लेंढी नदीला आलेल्या पुराचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये एका जीपला दोरीने बांधलेलं दिसून येत असून दुथडी भरून नदी वाहत असल्याचं पाहायला मिळत आहे. बीड जिल्ह्यातील पावसाची तीव्रता या व्हिडिओद्वारे स्पष्ट दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून बीड जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झालं होतं.

आज दुपारी धारूर तालुक्यात झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं असून मे महिन्यात पाऊस पडल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. बीडसह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसानेव आज हजेरी लावत शेतीमालाचं मोठ्याप्रमाणात नुकसान केलं आहे. पूर्व मोसमी पावसाने शेतकऱ्यांच्या चिंतेत मात्र आणखी वाढ झाली आहे.

पाहा व्हिडीओ –

थोडक्यात बातम्या – 

कोवॅक्सिन ही 12 वर्षांवरील मुलांना देण्यास मान्यता मिळाल्याच्या व्हायरल मेसेज मागचं सत्य वाचा

‘उगाच कुणाच्या घरी जाऊ नका, त्यांच्याशी….’; गडकरींचा फडणवीसांना प्रेमळ सल्ला

देशातील 3 राज्यांमध्ये मागच्या 24 तासात एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू नाही

‘स्तनपानाला अजुनही आपल्याकडे…’; मातृदिनानिमित्त अमृता रावने व्यक्त केली खंत

पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, बरे होणाऱ्यांची संख्या दुपटीने वाढली

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More