बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुलगी जवळ येताच गाढवानं केलं असं काही की ते पाहून तुम्हीही चकीत व्हाल, पाहा व्हिडीओ

मुंबई | सगळे प्राणी, पक्षांना जीव लावतात. असंच माणूस आणि प्राण्यांमध्ये असणारं अतूट नातं सांगणारा व्हिडीओ व्हायरल होतोय. का गाढवाचा आणि त्याला पाळणाऱ्या एका मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

या व्हिडीओला पुन्हा पुन्हा पाहत राहावं असं वाटतं. या व्हिडीओमध्ये एक पांढऱ्या रंगाचे गाढव एका मुलीकडे येताना दिसतेय. मुलीकडे येताना हे गाढव मोठ्या आवाजात ओरडत आहे.

व्हिडीओमध्ये एक गेट दिसत आहे. या गेटमुळे मुलीला आतमध्ये जाता येत नाहीय. त्यामुळे बाहेरूनच ती आपले दोन्ही हात पसरवरून त्याला बोलवत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्या मुलीला पाहून त्या गाढवाला खूप आनंद झाला असल्याचं त्याच्या चेहऱ्यावरून दिसून येत आहे. गाढव त्या मुलीकडे धावत येऊन तिला मिठी मारताना दिसत असून, त्या मुलीनेही त्या गाढवाचं तोंड आपल्या हातात धरलं आहे.

गाढव तिच्या जवळ गेल्यानंतर ती त्याला आपल्या मुलाप्रमाणे गोंजारत आहे. त्याच्यावरून हात फिरवत आहे. तसेच ते गाढवही आपली मान त्या मुलीच्या अंगाला घासत आहे. त्यांचे हे अटूत नाते पाहून अनेकजण भावूक झाले आहेत. त्याचप्रमाणे हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

केंद्र सरकारकडून दिलेल्या वेळेची मर्यादा आज संपुष्टात; ‘या’ समाज माध्यमांवर कारवाई होणार?

‘यास’ चक्रिवादळाचा ट्रेलर, ताशी 150 कि.मी वेगानं धडकण्याची शक्यता ; पाहा व्हिडीओ

कोरोनाची लस जगात सर्वात आधी घेणाऱ्या ‘विल्यम शेक्सपिअर’चा मृत्यू

माहेरी जाताना नवऱ्याला बाईक थांबवायला सांगितली, त्यानंतर तिने जे केलं त्याने सर्वच हादरले

खळबळजनक! शौचालयासाठी घराबाहेर पडलेल्या महिलेवर गँगरेप, खांबाला लटकवलं अन्…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More