नवी दिल्ली | गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा(Gujarat Election) सोमवारी अंतिम टप्पा पार पडला. या मतदानासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) अहमदाबादमध्ये पोहचले होते. यावेळी त्यांनी मतदान करत मतदानाचा हक्क बजावला.
गुजारातला आल्यानंतर मोदी गांधीनगर येथे त्यांच्या आईला भेटायलाही गेले होते. यावेळी त्यांनी आईचा आशिर्वादही घेतला. या भेटीदरम्यानचे फोटो समोर आले आहेत.
या फोटोंत मोदींच्या अंगावर एक शाल घेतली दिसत आहे. सध्या या शालीची जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
मोदींनी अंगावर घेतलेली ही शाल पिवळ्या रंगाची आहे. त्यावर बारीक पानांची डिजाईन आहे. ही शाल महागडी असल्यानं, या शालीच्या किमतीची चर्चा सगळीकडं होताना दिसत आहे.
एका वेबसाइटने शालीची किंमत समोर आणली आहे. या शालीची किंमत 1 लाख 34 हजार रूपये आहे, असं सांगण्यात येत आहे.
दरम्यान, गुजारतल्या मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात सोमवारी मोदींसह केंद्रीय मंत्री अमित शाह(Amit Shah) आणि हार्दिक पटेल(Hardik Patel) यांनीही मतदानाचा हक्क बजावला.
महत्वाच्या बातम्या-