बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नाशिकच्या लाचखोर फरार महिला शिक्षणाधिकारी यांची संपत्ती पाहुन तुम्हीही व्हाल थक्क!

मुंबई | एसीबीच्या हातावर तुरी देऊन पोबारा झालेल्या नाशिकच्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांच्या मालमत्तेची एसीबी झाडाझडती करत आहे. एसीबीकडून करण्यात येत असलेल्या चौकशीत वैशाली झनकर यांच्या संपत्तीची महत्वपूर्ण माहिती हाती लागली आहे. चौकशीच्या माहितीनुसार वैशाली झनकर यांच्याकडे फ्लॅट, जमीन, कार, रोख रक्कम असं घबाड सापडलं आहे.

वैशाली झनकर यांच्या नावावर मुरबाड, कल्याण रोड, नाशिक शिवाजीनगर, कल्याण गंधारे आणि नाशिक गंगापुर रोड येथील चार फ्लॅट त्यांच्या नावावर आहेत. तसेच वैशाली झनकर यांच्या नावी सिन्नर मध्ये 0.57 गुंठे, 0.56 गुंठे, 1.51 गुंठे, 3.41 गुंठे जमीेन आहे. तसेच कल्याणमधील मिलींदनगर येथे 31.70 गुंठे,10.08 गुंठे,40.80 गुंठे आणि 13.10 गुंठे जमीेन आहे. याबरोबर सिन्नर मध्ये अजून 0.22.70 गुंठे जमीन आहे. वैशाली झनकर यांच्याकडे 40 हजार रुपये रोख रक्कम, होंडा सिटी कार देखील त्यांच्याकडे आहे.

शासनाने मंजूर केलेल्या दोन शिक्षणसंस्थांच्या शाळांच्या 20 टक्के अनुदानानुसार नियमीत वेतन चालू करण्यासाठी लाचेच्या रकमेची मागणी केली होती. यानंतर तक्रारदाराकडून एसीबीच्या महासंचालकाकडे तक्रार केली होती. एसीबीच्या आदेशाने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता, त्यांना त्यात तथ्य आढळलं.

दरम्याण, ठाणे पोलीस अधीक्षक पंजाब उगले यांच्या आदेशाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पल्लवी ढगे यांच्या पथकाने सापळा रचत कारवाई केली. मंगळवारी संध्याकाळी ज्ञानेश्वर येवले हा गाडीचालक वैशाली झनकर यांच्या आदेशाने रक्कम घेण्यास आला असता त्याला 8 लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलं. या प्रकारनानंतर वैशाली झनकर फरार झाल्या असल्याची माहिती आहे.

थोडक्यात बातम्या –

हॅलो, मी शरद पवार बोलतोय! ‘त्या’ नकली फोन कॉलमुळे मंत्रालयात खळबळ

देशात आणीबाणीसारखी परिस्थिती- खासदार सुप्रिया सुळे

राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीपातीचा मुद्दा मोठा झाला- राज ठाकरे

“संसदेमध्ये महिला सदस्यांना धक्काबुक्की ही तर ‘गुजरात मॉडेल’ ची प्रतिकृती”

रक्षाबंधनाच्या अगोदर नरेंद्र मोदींनी महिलांना दिलं हे खास गिफ्ट; केली मोठी घोषणा!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More