बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लहानशा पक्ष्याला वाचवायला गेला शार्कजवळ अन् पुढं जे झालं ते पाहून तुम्हाली बसेल धक्का, पाहा व्हिडीओ

माले |  सोशल मीडियावर आपण पाहतो अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील अनेक व्हिडीओ पशु-पक्ष्यांचे असतात. आपल्याला माहित असेल की, काही लोक खूप पशु-पक्षी प्रेमी असतात. काही-काहींना त्यांच्याविषयी खूपच प्रेम, जिव्हाळा असतो. आपल्या जीवाची पर्वा न करता ते त्यांचा जीव जपत असतात.

अशातच एक सोशल मीडियावर याच संबंधी एक व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने चक्क एका पक्षाला वाचवण्यासाठी समुद्रात उडी घेतली आहे. व्हिडीओमध्ये एक व्यक्ती समुद्रात उडी मारतो. त्या पक्षाला वाचवण्यासाठी तो पाण्याच्या खूप खोलवर गेला असल्याचं दिसून येत आहे.

पक्षाला हातात घेऊन येताना, त्याच्या समोर अचानक एक मोठी सार्क येते. आपल्याला साधा लहान मासा पकडायचा झाला, तरी आपण घाबरतो. इथं तर त्याच्यासमोर एक भली-मोठी शार्क आहे. परंतू तरीही तो घाबरला नाही. तो धीटपणे पुढे-पुढे पोहत जातो, तस-तसा शार्कही आपला मार्ग बदलते. काही वेळानंतर तीही दुसऱ्या दिशेला जाते. त्यानंतर तो व्यक्ती त्या लहानशा पक्षाला सुखरूप हातात घेऊन बोटवर येतो.

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ न्यू यॉर्क पोस्ट या युजरने आपल्या ट्विटर आकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओ आतापर्यंत 13 हजार लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर या व्हिडीओला अनेक कमेंट देखील येत आहेत.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

लहान मुलाला समोर बघताच वाघाने केला हल्ला अन्…; पाहा व्हिडीओ

विकृतीचा कळस! कोरोनाग्रस्त सासूने सुनेला आणि नातवाला मारली मिठी अन्…

प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करुन घरातच पुरला मृतदेह, चिमुकलीला धमकी, पाहा व्हिडीओ

पुण्यातील गरवारे शाळेच्या मैदानावर केला मित्राचा खून अन्….

6 वर्षीय मुलीच्या ‘या’ व्हिडीओवर शिक्षण विभागाने घेतली दखल, बदलली ऑनलाईन क्लासची वेळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More