“तुम्हाला उपवास करूनही चांगली बायको मिळणार नाही”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पुणे | एमपीएससीचा(MPSC) नवा पॅटर्न 2025 पासून लागू करावा यासाठीसोमवारी पुण्यात अलका टाॅकीज चौकात विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं. या आंदोलनाला यश मिळालं आहे.

भाजपचे(BJP) आमदार गोपीचंद पडळकर(Gopichand Padalkar) यांच्यामार्फत विद्यार्थ्यांची ही मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांच्यापर्यंत पोहचवण्यात आली होती. आता विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार एमपीएससीचा नवा पॅटर्न 2025 पासून लागू करण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत झाला आहे.

हा निर्णय होताच एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आनंद साजरा केला. याच पार्श्वभूमीवर पडळकरांचे भाषण झाले. भाषणाच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला.

पडळकर भाषणात म्हणाले आहेत की, जर मुलीनं सोमवारी उपवास केला तर तिला चांगला नवरा मिळू शकतो. पण मुलांनो तुम्हाला उपवास करून चांगली बायको मिळणार नाही. तुम्हाला एमपीएससी परिक्षा पास व्हावं लागेल.

दरम्यान, सरकारच्या या निर्णयानंतर विद्यार्थ्यांनी आनंदाच्या भरता पडळकरांना उचलून घेतलं आणि त्यांच्या नावाचा जयजयकार केला.

महत्वाच्या बातम्या-