चेकअप करणाऱ्या नर्सला पाहून लहान मुलाने दिली Cute Reaction ; व्हिडीओ होतोय व्हायरल

नवी दिल्ली | ‘लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा खवा’ लहानपण सगळ्यांचंच आल्हादायक असतं. लहान बाळाचं हासणं,रडणं आणि दंगा याचं सगळ्यांनाच कौतुक असतं. हल्ली लहान मुलांचे अनेक सोशल मिडिया अकाउंट आहेत. यावर पालक त्यांचे व्हिडीओ, फोटो देखील टाकतात.

हल्ली लहान मुलांचे खूप छान व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. असाच एक क्युट व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. लहान मुलं नेहमीच इंजेक्शन, डाॅक्टर यांना घाबरतात. या व्हिडीओत मात्र हा क्यूट बेबी (cute baby) डाॅक्टरांना पाहून घाबरत नाही आहे.

या व्हिडिओत नर्स एका लहान मुलाला तपासत आहे. यावेळी ती त्या लहान बाळाला मशीन लावून तपासत आहे. यावेळी त्या छोट्या मुलांनं दिलेली प्रतिक्रिया (reaction) व्हायरल होत आहे. एका ट्विटर युजरने (Twitter user) हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा कधीचा आणि कुठला आहे याची कल्पना नाही. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चेहऱ्यावर मात्र नक्की हसू येईल.

नर्स चेकअप करत असताना नर्सनं स्टेथोस्कोप (Stethoscope) त्या लहान मुलाच्या छातीला लावला आहे. ती त्याला तपासत असते. तो लहान मुलगा त्या नर्सकडं बघू लागतो. बघता बघता तो तसाच झोपतोय आणि नर्सकडं पाहून छान क्युट स्माईल देत आहे. हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ खूप जुना असल्याचं काही युजर्सनी कमेंट (Comment) केली आहे. व्हिडिओ जुना असला तरीदेखील या मुलाच्या गोड हसण्यानं पुन्हा व्हायरल होत आहे असं काहीनी म्हणलं आहे. हा व्हिडिओ कीतीहीवेळी पाहिला तरीदेखील त्या मुलाकडं पाहून चेहऱ्यावर हसू येतंच असंदेखील काहींनी म्हणलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या