मुलीकडं एकटक पाहून डोळा मारणं महागात; तरुणाला 3 वर्षांची सक्तमजुरी

प्रातिनिधीक फोटो

बीड | टपोरीगिरी करणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. मुलीकडे एकटक पाहून तिला डोळा मारणाऱ्या 24 वर्षीय तरूणाला बीड जिल्हा व सत्र न्यायालयाने 3 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.

पुरुषोत्तम ज्ञानदेव वीर असं दोषीचं नाव आहे. त्याने बसची वाट पाहात असणाऱ्या अल्पवयीन मुलीकडे बराच वेळ रोखून पाहात तिला डोळा मारला. त्यामुळे मुलीने पाटोदा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती.

मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी विनयभंग आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यानूसार (पोक्सो) गुन्हा दाखल केला होता.

त्यानंतर सत्र न्यायालयाने आरोपीला 3 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. अशा प्रकारच्या प्रकरणात गुन्हा दाखल होऊन शिक्षा होण्याची कदाचित ही पहिलीच घटना असावी.

महत्त्वाच्या बातम्या-

-राहुल गांधींविरोधात सावरकर कुटुंबियांची पोलिसांत धाव!

-मुनगंटीवारांचं वनमंत्रीपद काढून घ्या; मनेका गांधींचं मुख्यमंत्र्यांना पत्र

-नेस्ले इंडियाची मोठी घोषणा; आता मॅगीचं पाकीट चक्क फुकट मिळणार!

-भाजपसाठी धोक्याची घंटा; लोकसभेतील जादूई आकडा गमावला

-दगाफटका झाल्यास रस्त्यावर उतरु; मराठा समाजाचा इशारा