बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक!!! बेरोजगारीला कंटाळुन पुण्यात इंजिनिअर तरूणाने उचललं हे टोकाचं पाऊल

पुणे | पुण्यातील कोंढवा परिसरातुन एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे, ऋषिकेश मारूती उमाप या तरुणाने बेरोजगारीला कंटाळुन आणि मोबाईल गेमच्या आहारी जाऊन राहत्या घरी गळफास लावुन आपली जिवनयात्रा संपवली. ऋषिकेश हा आपल्या आई-वडिलांसोबत कोंढवा परिसरात राहत असायचा.

ऋषिकेश हा इंजिनिअर होता आणि लाॅकडाऊनच्या काळात त्याची नोकरी गेली होती, त्यानंतर तो मोबाईल गेमच्या नादी लागला आणि पबजी खेळु लागला. नोकरी गेल्याचं दु:ख आणि मोबाईल गेममुळे तो नैराश्यात गेला आणि त्याने आपल्या राहत्या घरी रूममध्ये पंख्याला गळफास लावुन आत्महत्या केली.

कोंढवा परिसरात राहणारे मारुती उमाप हे निवृत्त सरकारी कर्मचारी आहेत. त्यांचा एक मुलगा नोकरीसाठी बंगळुरू येथे असतो तसेच दुसरा मुलगा त्यांच्यासोबत पुण्यातील कोंढवा परिसरातील घरी राहत होता. परंतु, अचानक झालेल्या या घटनेनंतर संपुर्ण कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

सोमवारी रात्री कोेंढव्यातील कावेरी पार्क सोसायटी येथील घरी तो नेहमीप्रमाणे रात्री जेवण करून झोपायला गेला, सकाळी 10 वाजले तरी ऋषिकेश आवाज देऊनही काही प्रतिसाद देत नसल्याने त्याच्या वडिलांना संशय आला आणि त्यांनी दरवाजा तोडुन आत प्रवेश केला, तेव्हा त्यांना ऋषिकेशचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या स्थितीत आढळुुन आला. पोटच्या गोळ्याला अशा अवस्थेत पाहुन त्यांनी एकच टाहो फोडला. या प्रकरणात कोंढवा पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

थोडक्यात बातम्या

लॉकडाऊन रद्दच्या निर्णयाचा जल्लोष आला अंगलट; इम्तियाज जलील यांच्यावर झाली ‘ही’ कारवाई

महाराष्ट्रात 2 एप्रिलपासुन मर्यादित लाॅकडाऊन?; वाचा कसं असु शकतं स्वरूप

“हो, मी भाजप नेत्याला फोन केला होता पण…”- ममता बॅनर्जी

भारताच्या माजी पंतप्रधानांना कोरोनाची लागण; मोदींनी फोनवरून दिला ‘हा’ सल्ला

अॅम्बुलन्सचं स्पीड इतकं की, व्हिडीओ पाहून लोकंही झाले चकीत, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More