Top News पुणे महाराष्ट्र शेती

आंदोलनजीवी! शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ पुण्यात मिटअपचं आयोजन

पुणे | केंद्र सरकारने कोणतीही चर्चा न करता शेतकऱ्यांना जाचक असलेले 3 कृषी व्यापार कायदे संख्याबळाच्या जोरावर संसदेत मंजूर केले. याविरोधात गेल्या 3 महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. हे आंदोलन चिरडून टाकण्याचे प्रयत्न देखील करण्यात आले मात्र शेतकरी खंबीरपणे आपल्या मागण्यासोबत आजही आंदोलन करत आहे.

शेतकऱ्यांना जाचक असलेले हे 3 कृषी व्यापार कायदे समजावून सांगण्यासाठी 14 फेब्रुवारी 2021 रविवार या दिवशी पुण्यात कोथरूड येथील गांधी भवनात ‘यंग इंडिया मिटअप’चं आयोजन करण्यात आलं आहे.

रविवारी सकाळी 10 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत तीन सत्रात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, क्रीडा व युवक मंत्री सुनील केदार उपस्थित राहणार आहे.

शेतकरी आंदोलन कसे उभे राहिले व कृषी व्यापार कायदे समजावून सांगण्यासाठी दिल्लीतील किसान आंदोलनातील तरुण चेहरे अखिल भारतीय किसान युनियनचे सदस्य भुपेंदर चौधरी, सामाजिक राजकीय कार्यकर्त्या मुस जट्टाना उपस्थित राहणार आहे. याबरोबरच विविध विषयांवर बोलायला काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा, महाराष्ट्र काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, आमदार अमित झनक, काँग्रेस रिसर्चच्या लेणी जाधव, अतुल लोंढे, रत्नाकर महाजन, अर्थतज्ञ श्रीकांत बारहाते, ज्येष्ठ पत्रकार आशिष जाधव, संजय आवटे, विजय चोरमारे, आलोक देशपांडे, जयदीप हर्डीकर, नेहरू विचारांचे अभ्यासक राज कुलकर्णी व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

थोडक्यात बातम्या-

“…लायकी नसताना शरद पवारांसारख्या नेत्यावर आरोप करू नये”

उद्धव ठाकरे शरद पवारांच्या निरोपाची वाट पाहतायेत का?- किरीट सोमय्या

…म्हणून महाराष्ट्रात महिलांना 50 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला- शरद पवार

लाजिरवाण्या पराभवाचा इतिहास पुसून टाकण्यासाठी तयारीला लागा- रामदास आठवले

अजित पवारांनी मान्य केली अजित यशवंतरावांची ‘ती’ मागणी, दिले 1.09 कोटी!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या