बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! भररस्त्यात तरूण उद्योजकाची गोळ्या घालून हत्या

लखनऊ | उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे एक तरुण रात्री दुकान बंद करत असताना त्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. तरुणावर गोळ्या झाडताच आजूबाजूच्या  लोकांनी त्यांच्या दुकानाचे शटर खाली ओढलं.

शंभु मौर्य असं मृत तरुणाचं नाव असून हा तरुण उत्तर प्रदेशातील गगाह परिसरातील रहिवासी होता. या तरुणाचं गगाह-जानीपूर रस्त्यावर सार्वजनिक आरोग्य केंद्राजवळ इलेक्ट्राॅनिक्सचं दुकान आहे. शंभु आणि त्याचा कामगार संध्याकाळच्या सुमारास दुकान बंद करुन घरी जातात. मात्र बुधवारी रात्री दुकानात काम करुन ते दोघे दुकान बंद करत होते. यादरम्यान दुचाकीवरुन दोघांनी येऊन शंभु आणि त्याच्या कामगाऱ्यावर गोळी झाडली.

गोळीचा आवाज ऐकून परिसरातील आजूबाजूच्या  दुकानदारांनी त्यांच्या दुकानाचे शटर खाली ओढले. हल्लेखोरांनी गोळी झाडताच ते तेथून पसार झाले. त्यानंतर लोकांनी शंभुच्या दुकानाजवळ धाव घेतली. तेव्हा शंभु आणि त्याचा कामगार रस्त्यावर रक्तबंबाळ होऊन पडले होते. दोघांनाही तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

दरम्यान, महिनाभरातील गगाह परिसरातील ही दुसरी घटना असून याआधी राकेश मौर्या नावाच्या व्यक्तीची देखील हत्या करण्यात आली होती. राकेश मौर्या आणि शंभु मौर्या या दोघांचे जवळचे संबंध असल्याची माहिती लोकांनी पोलिसांना दिली आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. मात्र शंभु आणि त्याच्या कामगाराच्या हत्येमागचं कारण अद्दाप स्पष्ट झालेलं नाही.

थोडक्यात बातम्या-

‘…हे पाहिल्यानंतर मी कधीही मास्क विसरणार नाही’; मुंबई पोलिसांनी दिलेल्या शिक्षेला आनंद महिंद्राही घाबरले

सुपरस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर!

कर्नाटकात भाजपला मोठा धक्का; ‘ऑपरेशन लोटस’ची चौकशी होणार

आणखी एका राष्ट्रवादीच्या नेत्याकडून महिलेवर लैंगिक अत्याचार- तृप्ती देसाई

“शिवसेना मी घराघरात पोहोचवली, मीच स्वत: राजीनामा देणार होते”

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More