बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

म्युझिक स्कूलची फी भरण्यासाठी तरुणाची रस्त्यावर कसरत, पाहा व्हिडीओ

मुंबई | सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ धुमाकूळ घालत असतात. यातील अनेेक व्हिडीओ थेट हृदयाला स्पर्श करुन जातात. असाच काहीसा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओनं सध्या सोशल मीडियावर सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.

सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ एका तरुणाचा असून तो रस्त्यावर गाणं गाताना दिसत आहे. 1990 च्या चित्रपट जुर्म मधील ‘जब कोई बात बिगड़ जाये’ हे गाणं गात आहे. तो रस्त्यावरील येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचं या गाण्यानं लक्ष वेधत आहे. काही क्षणातच हा व्हिडीओ तुफान व्हायरल झालेला पहायला मिळत आहे.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, तरुणाच्या पुढे एक साइनबोर्ड आहे. त्या बोर्डवर अनेक ऑनलाइन पेमेंट प्लॅटफॉर्म तसेच मदतीसाठी योगदान देऊ इच्छित असलेल्या प्रत्येकासाठी क्यूआर कोड आहे. यासोबत त्यानं एक संदेशही लिहिलेला आहे.  यामध्ये त्यानं लिहिलंय की तुमच्या योगदानाबद्दल धन्यवाद, हे योगदान माझ्या म्युझिक स्कूलची फी भरण्यासाठी आहे.

दरम्यान, या व्हिडीओला सोशल मिडीयावर भरपूर प्रतिसाद मिळत आहे. भरभरुन लाईक्स आणि कमेंटचाही वर्षाव होत आहे. व्हिडीओ अनेकांच्या पसंतीस उतरत आहे.

 

थोडक्यात बातम्या –  

“कोरोनामुळे जीव गमावणाऱ्या कुटुंबीयांना मिळणार 50,000 रुपयांची आर्थिक मदत”

पुण्यातील रिक्षा प्रवास महागणार; असे असणार नवे दर

“आपलं घराणं कुठलं, करताय काय?” शिवेंद्रराजेंचा उद्यनराजेंना खोचक टोला

समीर वानखेडेंच्या पाठीशी आहे ‘या’ व्यक्तीचा आशिर्वाद; क्रांती रेडकरने केला खुलासा

“महात्मा गांधी यांच्या सांगण्यावरुन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दया याचिका दाखल केली होती”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More