बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आमचं तसं काही ठरलं नाही… दिशा पटानीविषयीचा प्रश्न विचारताच आदित्य ठाकरे लाजले!

अहमदनगर |  संगमनेरमध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावतीने मेधा युवा सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात राज्यातल्या तरुण आमदारांसोबत संवाद होत आहे. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, आमदार आदिती तटकरे, काँग्रेसचे आमदार ऋतुराज पाटील, धीरज देशमुख, झिशान सिद्दिकी यांनी एकाच मंचावर हजेरी लावली आहे.

गायक आणि संगीतकार अवधूत गुप्ते हे तरूण आमदारांशी संवाद साधत आहेत. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंना त्यांच्या लग्नाविषयी आणि दिशा पटानीविषयी प्रश्न विचारला. यावेळी आदित्य ठाकरेंनी लाजत ‘आमचं तसं काही ठरलं नाही…’, असं उत्तर दिलं.

विशिष्ट वयात आई आपल्या मुलांची काळजी घेत असते. परंतू वय वाढलं की ती जबाबदारी दुसऱ्या कोणाच्या तरी खांद्यावर जाते… आता काही ठरलंय का? या प्रश्नाला उत्तर देताना ‘तुमची दिशा चुकतीये…’ असं आदित्य म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. त्यावर आदित्य Eligibale And Available आहेत, असं धीरज देशमुख म्हणाले आणि पुन्हा एकदा उपस्थितांध्ये खसखस पिकली.

आमची मैत्री एकत्र आल्याने महाराष्ट्रात जो बदल घडला त्यानंतर लगोलग झारखंडमध्ये घडला. आता आम्हाला नवा महाराष्ट्र घडवायचाय, असं आदित्य म्हणाले.

ट्रेडिंग बातम्या-

उदयनराजेंचा अपमान सहन करू शकत नाही- संभाजी भिडे

उद्धवराव, मी हात जोडून विनंती करतो… त्या संजय राऊतला पदावरून हटवा- संभाजी भिडे

अन्न, वारा आणि पाण्याइतकीच शिवसेना आवश्यक, पण…- संभाजी भिडे

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More