‘आता प्रवाहासोबत जावं लागणार’, आणखी एका नेत्याचा शिवसेनेला जय महाराष्ट्र
मुंबई | शिंदे गटाने शिवसेनेला धक्के देण्याची मोहीम जोरदार सुरु केली आणि आतापर्यंत चालू ठेवली आहे. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे दिल्लीला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना भेटायला गेले आहेत. मुख्यमंत्री झाल्यापासून गेल्या पंधरवड्यात ही त्यांची दुसरी दिल्ली वारी आहे.
शिवसेनेचे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगल्याचे तरुण खासदार म्हणून ओळख असलेेले धैर्यशील माने (Dharyashil Mane) हे आता शिंदे गटात गेल्यातच जमा आहेत. त्यांच्या फोनवरील संभाषणाची आता एक ऑडिओ क्लिप प्रचंड व्हायरल झाली आहे. त्यात त्यांनी आपल्या एका कार्यकर्त्याजवळ मनातील खदखद व्यक्त केली. शिवसेना नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यातील संघर्ष लवकर संपून दोघांनी एकत्र यावं असं मला मनोमन वाटतं. परंतू आता परिस्थिती हाताबाहेर गेली आहे, असं माने म्हणाले.
आपण सध्या परिस्थितीचे बळी झालो असून अशी परिस्थिती कोणाच्याही राजकीय आयुष्यात येऊ नये. आता आपल्याला प्रवाहाबरोबरच जावं लागणार आहे, असे माने म्हणाले. त्यामुळे त्यांचे शिंदे गटाकडे जाण्याचं नक्की झालं आहे, अशी माहिती समोर आलीये. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील आणखी एक खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandalik) यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर शिंदे गटात प्रवेश करण्याचं स्पष्ट केलं आहे.
मी कधीही छक्के पंजे केले नाहीत, कधी पैशांच्या मागे लागलो नाही, जे समोर येत गेले ते करत राहीलो. माझा भावनिक संबंध शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंशी आहे. मी शिवसेना सोडत नाही आहे. पण आता शिवसेना अंतर्गत वेगळी झाली आहे. त्यामुळे मला आता प्रवाहाबरोबर जाणं प्राप्त आहे, असं धैर्यशील माने फोनवर बोलले. खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने पत्रकार परिषद घेऊन आपला निर्णय जाहीर करणार आहेत.
थोजक्यात बातम्या –
“सत्तेची भांग प्यायलेले उद्या मातोश्री आणि सेना भवनावर सुद्धा कब्जा करतील”
महाराष्ट्रातील ‘या’ बँकेवर RBI ची मोठी कारवाई; ग्राहकांना झटका
एकीकडे पूरग्रस्तांचे हाल तर दुसरीकडे फोडाफोडीचं राजकारण सुरूये- आदित्य ठाकरे
राष्ट्रपती निवडणुकीत ‘त्या’ आमदारांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका!
शिवसेना खासदारांना घेऊन एकनाथ शिंदे मोदींना भेटणार?, फक्त हे 6 खासदार ठाकरेंसोबत!
Comments are closed.