बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बॉसने दरडावल्याने तरूणीचा आत्महत्येचा प्रयत्न, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई | सध्या सोशल मीडियावर एका तरूणीचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. बॉसने फटकारल्यामुळे ही तरूणी थेट आत्महत्या करायला निघाली होती. ही घटना फरिदाबादमध्ये घडलीये. तेथे उपस्थित असणाऱ्यांपैकी एकाने हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद केला आहे. यानंतर या घटनेचा व्हिडीओ वाऱ्यासारखा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ पाहून नेटकरी विविध प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. अनेकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. फरिदाबाद पोलिसांनी सुद्धा हा व्हिडीओ त्यांच्या ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.

आत्महत्येचा प्रयत्न करणारी तरुणी ही 23 वर्षांची असून ती दिल्लीमधील नांगलोई येथील रहिवासी आहे. ती फरिदाबाद येथील एका कंपनीमध्ये काम करते. दरम्यान, काम करताना या तरुणीला तिच्या बॉसने फटकारलं. यानंतर रागाच्या भरात ती सुसाईड करायला मेट्रो स्टेशनवर चढली होती.

तरूणीला पाहण्यासाठी रस्त्यावरील लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यानंतर योग्य वेळ साधत CISF चा जवान त्या तरुणीजवळ गेला. त्यानंतर जवानाने तरुणीला पकडलं आणि तिला आत्महत्या करण्यापासून रोखलं. CISF जवानामुळे तरूणीचे प्राण वाचले.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

दिल्लीतील महाराष्ट्र सदनाला आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल

बसच्या छतावर शेकडो लोक, ड्रायव्हरने लावला ब्रेक अन्…, पाहा व्हिडीओ

“ओबीसी आरक्षणाबद्दल केंद्राला किती राग आहे, ते दिसतंय”

“मत मागायला याल, तेव्हा कोकणी माणूस तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही”परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ; खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More