मुंबई | वांद्रे पूर्व मतदारसंघातील कॉंग्रेस आमदाराने ‘कोरोना’बचावासाठी अँक्शन प्लॅन आखला आहे. यंदाच्या विधानसभेतील सर्वात तरुण आमदार झिशान सिद्दीकी यांनी संपूर्ण पगार मतदारसंघाला देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
मी माझे संपूर्ण आमदार वेतन आपला मतदारसंघ आणि माझ्या जनतेला देण्याचे आश्वासन दिले होते. माझ्या वांद्रे पूर्व मतदारसंघामधील मतदारांसाठी मास्क आणि सँनिटायझर्स खरेदी करण्यासाठी वेतनाचा काही भाग खर्च करणार आहे, असं झिशान यांनी सांगितलं आहे.
आम्ही शनिवारपासून हे वितरण सुरु करु. 30 हजार मास्क आणि 3 हजार मिली सँनिटायझर्स वाटले जाईल, अशी माहिती झिशान सिद्दीकी यांनी ट्विटरवरुन दिली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना हातपाय पसरण्याआधी वेळीच आळा घालण्याची आवश्यकता आहे. गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
अन्नदात्यासाठी अन्नत्याग… साऱ्या महाराष्ट्रात झाले अन्नत्याग आंदोलन
कंपन्यांनी कोणत्याही कर्मचाऱ्यांचा पगार कापू नये- नरेंद्र मोदी
महत्वाच्या बातम्या-
निर्भया प्रकरण: शेवटची इच्छा काय?; तुरुंग प्रशासनाच्या प्रश्नावर आरोपी म्हणाले…
“असा गुन्हा करण्याचा विचारही कोण करणार नाही अशी भिती तयार करायची असेल तर…”
तुम्ही पापं केली म्हणून कोरोना आला- राखी सावंत
Comments are closed.