भर कॉन्सर्टमध्ये गायिकेसोबत घडला धक्कादायक प्रकार; प्रायव्हेट पार्टबाबत..

Monali Thakur | कलाकार मंडळी तसेच गायक-गायिका यांच्यासोबत भर कार्यक्रमात किंवा कॉन्सर्टदरम्यान अनेक धक्कादायक प्रकार घडत असतात. अनेकदा चाहत्यांकडून नको ते कृत्य केलं जातं. या गोष्टींचा कलाकारांना प्रचंड त्रास होत असतो. अशात बॉलीवुडची प्रसिद्ध गायिका मोनाली ठाकूर हीच्यासोबतही असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे.

कॉन्सर्ट सुरू असताना एका प्रेक्षकाने मोनालीच्या प्रायव्हेट पार्टबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केली. यामुळे गायिका प्रचंड संतापल्याचं दिसून आलं. भर कॉन्सर्टमध्ये मोनालीला अशा गैरवर्तवणुकीला सामोरे जावे लागले आहे. यामुळे गायिकेने कॉन्सर्ट मध्येच थांबवली.

मोनाली ठाकूरसोबत घडला धक्कादायक प्रकार

काही मीडिया रिपोर्टनुसार, मोनाली ठाकूर ही 29 जूनरोजी भोपाळ येथील SAGE विद्यापीठात परफॉर्म करण्यासाठी आली होती. या कॉन्सर्टमध्ये कॉलेजच्या विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होती. परफॉर्मन्स सुरू असताना मोनालीने अचानकच कॉन्सर्ट थांबवला. यानंतर तिने आपल्या टीमला काहीतरी सांगितले आणि ती (Monali Thakur) खूपच संतापलेली दिसून आली.

मोनालीने गर्दीत उभ्या असलेल्या एका व्यक्तीकडे बोट दाखवून त्याने तिच्या प्रायव्हेट पार्टवर कमेंट केल्याचा आरोप केला. या प्रकाराला तिने लैंगिक छळ म्हटले आहे. गर्दीत काही व्यक्ती लपूनछपून कमेंट करतात असे तिने म्हटले. यावेळी मोनालीने सांगितले की, तू खूप लहान आहेस आणि अशा गोष्टी, वर्तवणूक कोणासोबतही करू नकोस असे तिने खडसावून बजावले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Monali Thakur (@monalithakur03)

मोनाली ठाकूर संतापली

‘मला या मुद्द्यावर आवाज उठवायचा होता आणि आता संधी मिळाली म्हणून मी बोलत आहे.’, असंही मोनाली म्हणाली आहे. हे प्रकरण शांत झाले आणि पुन्हा मग कॉन्सर्ट सुरू झाला. मोनालीने पुन्हा गाण्यास सुरुवात केली. मोनालीसोबत घडलेल्या या प्रकारामुळे चाहते देखील चांगलेच संतापले आहेत.

दरम्यान, मोनाली ठाकूर (Monali Thakur) ही राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका असून तिने अनेक हिट गाणी गायली आहेत, ज्यात ‘ये मोह मोह के धागे’, ‘सवार लू..’ आणि ‘जरा जरा टच मी’ या गाण्यांचा समावेश आहे. यासोबतच तिने बऱ्याच सिंगिंग रिॲलिटी शोजमध्ये जजची भूमिका देखील केली आहे.

News Title –  Youngster Misbehaves with Monali Thakur during Concert

महत्त्वाच्या बातम्या-

विधान परिषदेच्या चार जागांसाठी आज मतमोजणी; ‘त्या’ गोष्टीचा ठाकरे गटाने घेतला धसका?

‘ड्रेस घातलेल्या महिलांनी…’; संभाजी भिडेंचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीवर शरद पवार यांचं मोठं वक्तव्य!

रोहित शर्माने बारबाडोसच्या मैदानात रोवला भारताचा झेंडा; व्हिडोओ बघून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

‘अंपायरने गडबडीत चुकीचा निर्णय दिला’; आफ्रिका मीडियाचा मोठा दावा