बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“तुमची गाडी पेट्रोल, डिझेलवर चालत असेल पण मोदी सरकार कर वसुलीवर चालतं”

नवी दिल्ली | गेल्या वर्षभरापासून कोरोनाने सगळीकडे थैमान घातलं आहे. यामुळे सर्वसामान्य माणसांला आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. अशात वाढत्या माहागाईमुळे नागरिक त्रस्त आहेत. मे महिन्यापासून पॅट्रोल-डिझेलच्या भावात वाढ व्हायला सुरूवात झाली आहे. ती आजपर्यंत सुरूच आहे. आज पॅट्रोल-डिझेलचे भाव तर गगनाला टेकले आहेत. यावरून काँग्रेसने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. यासंदर्भात राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी तुमची गाडी पेट्रोल, डिझेलवर चालत असेल पण मोदी सरकार कर वसुलीवर चालतं, असं म्हणत मोदी सरकारला चांगलाच टोला लगावला आहे.

राहुल गांधी यांनी दिल्ली आणि मुंबईतील आजचे पॅट्रोल आणि डिझेलचे दरही काय आहेत. याची माहिती दिली आहे. आज पुन्हा दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. दिल्लीत पेट्रोलची किंमत 100.21 रूपये आहे. तर डिझेल प्रति लिटर 89.53 रूपयांवर पोहोचलं आहे. त्याचबरोबर मुंबईमध्ये पॅट्रेलचा भाव 106.25 रूपये आणि डिझेलचा 97.09 रूपयांवर गेला आहे.

दरम्यान, मे महिन्यापासून आतापर्यंत एकूण ३६ वेळा पॅट्रोलच्ा किंमतींमध्ये वाढ करण्यात आली आहे. तर डिझेलच्या किंमतीत 34 वेळा वाढ झाली आहे. या वाढीमुळे इंधनाची किंमत आता देशातील बहुतेक पेट्रोल पंपांवर नव्या विक्रमावर पोहोचली असल्याचं दिसत आहे.

 

थोडक्यात बातम्या-

जावयापाठोपाठ एकनाथ खडसे आणि मंदाकिनी खडसेंनाही अटकेची शक्यता- असीम सरोदे

देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये 9 हजारांनी वाढ, कोरोनाबळी पुन्हा नऊशेपार

जळगाव महापालिकेत खळबळ; नगरसेवकांनी घेतलेल्या निर्णयामुळे भाजपला मोठा धक्का

…असं काहीतरी होणारच होतं, कारण ईडी ही भाजपची प्रेयसी आहे- अमोल मिटकरी

दिलीप कुमार यांचं निधन हे आपल्यासाठी एक सांस्कृतिक नुकसान आहे- नरेंद्र मोदी

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More