पंजाबच्या विजयानंतर आईला मिठी मारत भगवंत मान भावूक, पाहा ‘तो’ व्हिडीओ
नवी दिल्ली | देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे कल जाहीर करण्यात आले आहेत. उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर येथे भाजप आघाडीवर आहे. पंजाबमध्ये ‘आप’ने मोठी मुसंडी मारली आहे. आपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार भगवंत मान विजयी झाले असून त्यांचा भावूक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
भगवंत मान यांनी भाषणाला सुरूवात करण्यापूर्वी आपल्या आईला मिठी मारली. भगवंत मान यांनी आपल्या कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंग यांचे फोटो लावणार असल्याचं सांगितलं आहे. पंजाबमधील लोकांना नोकऱ्या देणे आणि शांतता राखणे हे माझे स्वप्न आहे, असं भगवंत मान म्हणाले आहेत.
पक्षाने माझ्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे आणि जनतेने माझ्यावर विश्वास दाखवला आहे. आता मोठ्या उत्साहाने जनतेसाठी काम करणार असल्याचं ते म्हणाले आहेत. पंजाबमध्ये रोजगार हा मोठा प्रश्न आहे. तरूणाई नैराश्यात गेली आहे. त्यामुळे आम्ही लोकांना रोजगार आणि शिक्षण देण्यास प्राधान्य देणार असल्याचं भगवंत मान यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, पंजाबमधील माफिया राज संपवायचा आहे. लोकांना उच्च दर्जाच्या सोयी सुविधा पुरवायच्या आहेत. भगवंत मान यांना पंजाबमधील जनता मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पाहात होती, असा दावा आप’ने केला आहे. भगवंत मान हे पंजाबमधील आम आदमी पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पंजाबमध्ये आगामी काळात आप कोणती कामगिरी करून दाखवणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पाहा व्हिडीओ-
ਬਦਲਾਅ ਅਤੇ ਇਮਾਨਦਾਰ ਰਾਜਨੀਤੀ ਦੇ ਹੱਕ ਵਿੱਚ ਫ਼ਤਵਾ ਦੇਣ ਲਈ ਪੰਜਾਬ ਹਿਤੈਸ਼ੀ ਲੋਕਾਂ ਦਾ ਦਿਲ ਦੀਆਂ ਗਹਿਰਾਈਆਂ ਤੋਂ ਧੰਨਵਾਦ https://t.co/VffLLUGLDz
— Bhagwant Mann (@BhagwantMann) March 10, 2022
थोडक्यात बातम्या-
“यह तो सिर्फ अंगडाई है, अब महाराष्ट्र कि बारी है”
पंजाबमधील विजयानंतर अरविंद केजरीवालांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
5 राज्यातील निकालांवर शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
‘म्याँव म्याँवचा आवाज ऐकायला येत नाहीये भाई…’, नितेश राणेंनी शिवसेनेला डिवचलं
“2024 मध्ये आम्ही महाविकास आघाडी सरकार पाडणार नाही, तर जनताच….”
Comments are closed.