“तुला आमदार करण्यासाठी तुझ्या बापानं…”

मुंबई | ठाकरे गटातील आणि शिंदे गटातील वाद दिवसेंदिवस चिघळतच चालल्याचे चित्र दिसत आहे. त्यातच आमदार आदित्य ठाकरेंनी(Aaditya Thackeray) थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांना चॅलेंज दिलं आहे.

शिंदे यांनी पदाचा आणि आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि वरळीतून निवडणूक लढवावी असं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी शिंदेंना दिलं आहे. आता आदित्य ठाकरेंनी दिलेल्या या चॅलेंजला रामदास कदम(Ramdas Kadam) यांनी उत्तर दिलं आहे.

रामदस कदम आदित्य ठाकरेंना म्हणाले की, आदित्य ठाकरे मुख्यमंत्र्यांना चॅलेंज देत आहे. पण अरे तुला निवडूण आणण्यासाठी तुझ्या बापानं उद्धव ठाकरेंनी(Uddhav Thackeray) विधान परिषदेचे दोन आमदार दिले.

माझीपण विधानपरिषद तुझ्या मतदासंघात दिली, तेव्हा तू निवडूण आला आहेस. तू काय मुख्यमंत्र्यांना चॅलेंज देतो.. प्रसिद्धी मिळण्यासाठी फक्त पोपटपंची चालू आहे, असंही रामदास कदम म्हणाले.

तसेच आदित्य ठाकरेंनी १०० जागा निवडूण आणण्याचा दावा केला आहे. यावर रामदास कदम यांनी उत्तर देत वंचित बहुजन आघाडीवरही भाष्य केलं.

रामदास कदम म्हणाले की, शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीनं युती केली आहे. पण वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत नाही. त्यामुळं ठाकरेंच्या वाटेला समजा ९० जागा आल्या तर त्यातील २० जरी वंजित बहुजन आघाडीला द्यायचं म्हटलं तरी आदित्य ठाकरे 100 जागा कुठून आणणार?, असा सवाल रामदास कदम यांनी उपस्थित केला.

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .