बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विमानात सीटवरुन साध्वी प्रज्ञांना गोंधळ; प्रवाशी संतापले

नवी दिल्ली | नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत राहणाऱ्या भाजपच्या भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञा साध्वी ठाकूर यांनी पुन्हा एकदा नवा वाद ओढवून घेतला आहे. साध्वी प्रज्ञा दिल्लीहून भोपाळला जात असताना हा प्रकार घडला. यावेळी साध्वी प्रज्ञा दुसऱ्या प्रवाशाच्या सीटवर बसल्या होत्या. त्यामुळे वाद निर्माण झाला.

या सगळ्या गोंधळामुळे हे विमान सुटायला पाऊणतास उशीर झाला. या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हीडिओत साध्वी प्रज्ञा प्रवाशांशी वाद घालताना दिसत आहेत. साध्वी प्रज्ञा या कोणतीही आगाऊ सूचना न देता व्हीलचेअर घेऊन विमानात आल्या. विमानातील कर्मचाऱ्यांना याची कल्पना नव्हती.

तरीही साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना विमानात बसण्याची मुभा देण्यात आली. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना दुसऱ्या आसनावर बसण्यास सांगण्यात आले. परंतु साध्वी प्रज्ञा यांनी कर्मचारी आणि सहप्रवाशांशी हुज्जत घालायला सुरुवात केली.

दरम्यान,संबंधित प्रवाशाने माघार घेण्यास नकार दिला. तुम्ही लोकप्रतिनिधी आहात. आम्हाला त्रास देणे हे तुमचे काम नाही. तुम्ही पुढच्या विमानाने यायला पाहिजे होते. तुमच्या एकट्यामुळे 50 प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय. पण, तुम्हाला जराही शरम वाटत नाही, असे प्रवाशाने त्यांना सुनावलं.

 

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More