बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘म्हातारी असेल तुझी आई…’, ट्रोल करणाऱ्यांना कविता कौशिकनं झापलं

मुंबई | प्रसिद्ध अभिनेत्री कविता कौशिकने ट्रोल करणाऱ्यांना जोरदार उत्तर दिलं आहे. एफ. आय. आर या विनेदी मालिकेतून कविता घराघरात पोहोचली. तसेच तिने अनेकांच्या मनात एक वेगळंच स्थान निर्माण केलं आहे. मात्र कविता तिच्या बोल्ड अंदाजांमुळे सतत चर्चेत असते.

इन्स्टाग्रामवर कविता प्रचंड सक्रीय असते. कविता सतत तिच्या आकाऊंटवर वेगवेगळे बोल्ड फोटो शेअर करते. अशातच तिच्या एका फोटो वर ‘बूढ़ी घोड़ी लाल लगाम’ अशा प्रतिक्रिया देत नेटकऱ्याने तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. यावर प्रत्युत्तर देत कविताने ट्रोलर्सची बोलती बंद केली.

भावा, मी कुठल्याही प्रकारचा लाल लगाम लावलेला नाही. अरे मी तर मेकअप सुद्धा केलेला नाही. केवळ थोडासा लिप बाम लावला आहे. आणि म्हातारे तर तुझे आई-वडिल देखील असतील. या देशात वय वाढणं पाप आहे का?, असा सवाल तिने केला आहे. कविताने काही दिवसांपुर्वी काळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये फोटो शेअर केला होता. आकाशात कोणीतरी आहे जो मला उडण्यासाठी पंख देतोय असं कॅपशन या फोटोला देण्यात आलं होतं.

एवढंच नाही तर आपल्या मुलांना तू हेच संस्कार देशील का? अणि तसं झालं तर चाळीशी नंतर तुझं आयुष्य जगणं हे व्यर्थच आहे, अशा शब्दात कविताने तिला ट्रोल करणाऱ्यांची बोलती बंद केली.

 

थोडक्यात बातम्या-

परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ; ईडी कार्यालयाच्या पायऱ्या चढाव्या लागणार

“आता तिथे सुखाने रहा, पूर्वीच्या स्वभावाप्रमाणे अजून कोणाला दुखवू नका”

साहेब, राष्ट्रपती व्हावेत हीच माझी इच्छा- सीमा आठवले

संजय राठोड पुन्हा मंत्रिमंडळात?; उदय सामंत यांचं सुचक वक्तव्य

“…तरच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत आघाडी होईल”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More