बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तुमचं मतदार यादीत नाव नाही?; मग आता करा थेट मोबाईलवरून नोंदणी

मुंबई | भारतीय लोकशाही ही मतदारांच्या राजपणावर चालत आलेली आहे. देशाच्या सर्वांगिण विकासात लोकशाहीचा सहभाग सर्वात मोठा आहे. परिणामी ही लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करणं हे फार मोठं काम असतं. आपल्या देशात मतदानाचा अधिकार हा 18 वर्ष पुर्ण झालेल्यांना देण्यात आला आहे. अशातच आता नवीन अॅपची निर्मिती निवडणूक आयोगानं केली आहे.

आपल्या लोकशाहीत सर्वांना मतदानाचा अधिकार आहे. वारंवार भारतीय निवडणूक आयोगाकडून मतदान प्रक्रियेत सर्वांना सहभागी करून घेण्यात येतं. वयाची 18 वर्ष पुर्ण झाली की लागलीच मतदान यादीत नाव नोंदवण्याची प्रक्रिया आता सुलभ करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगानं मतदार नोंदणी अभियान सुलभ व्हावं या हेतून आता ‘ई-व्होटर अॅप’ लाॅंच केलं आहे.

ई व्होटरच्या माध्यमातून आपण घरबसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून आपली नोंदणी करू शकता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपुर्वी सध्या राज्यात जोरदार मतदार नोंदणी कार्यक्रम राबवला जात असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त यु.पी.एस.मदान यांनी म्हटलं आहे. 1 जानेवारी 2021 पर्यंत वयाची 18 वर्ष पुर्ण झालेल्या सर्वांना 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत नाव नोंदणी आपल्याच मोबाईलद्वारे करता येणार आहे.

दरम्यान, देशातील अधिकाधिक नागरिकांना मतदान प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी निवडणूक आयोगातर्फे नोंदणी अभियान अॅपच्या माध्यमातून अधिक सुलभ करण्यात आलं आहे. ई-व्होटरच्या सहाय्यानं मतदाराला आपल्या मतदान ओळखपत्रात काही दुरूस्ती देखील करता येणार आहे.

थोडक्यात बातम्या 

खुल्लम खुल्ला प्यार! प्रसिद्ध गायिकेचा किसिंगचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल

लय जबरी पाऊस होणार!, महाराष्ट्रातील ‘या’ 6 जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी

शाहरुख-गौरीचं टेन्शन मिटलं, कजरारे गाण्यावर दोघंही तुफान नाचले!, पाहा व्हिडीओ

चंद्रपूरच्या तरुणीनं अनेकांना फोडलाय घाम, पहिल्यांदा द्यायची नयनसूख अन् त्यानंतर…

पुण्यात मोठी खळबळ, तृतीयपंथीयासोबत घडला अत्यंत निर्घृण प्रकार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More