बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“लसीकरण होऊनही तुमच्या निष्काळजीपणामुळे कोरोना पसरतोय”

मुंबई | कोरोना महामारीनं जगभरात हाहाकार माजवला आहे. त्यामुळे सध्या सगळीकडे चिंतेचे वातावरण निर्माण झालं असून कोरोनाची दुसरी लाट संपली नसतानाच तिसऱ्या लाटेचे संकेत दिले जात आहेत. त्यामुळे सगळीकडे लसीकरण मोहिम राबवली जातेय. यातच नागरिकांचं लसीकरण होऊनही कोरोना फैलावत असल्याचं दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आता उच्च न्यायालयानं नागरिकांना फटकारलं आहे.

कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक नागरिकाला लसीकरण घेण्यासाठी सांगितलं जात आहे. अशातच मोठ्या संख्येनं लसीकरण होऊनही कोरोना प्रादुर्भाव होण्यामागे नागरिकांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचं उच्च न्यायालयानं म्हटलं आहे.

लसीकरण होऊनही आता ऐन सनासूदीच्या मुहुर्तावर कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं सांगतिलं जात आहे. लसीकरण होऊनही नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे कोरोना फैलावत असल्यांचं म्हणत उच्च न्यायालयानं नागरिकांना फटकारलं आहे.

दरम्यान, लोकल प्रवासासाठी लसीकरण सक्तीचे करण्याला विरोध करणाऱ्या याचिकेवरील सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयानं हे मत व्यक्त केलं. त्यामुळे नागरिकांनी आता अधिक काळजी घेण्याची गरज आहे.

थोडक्यात बातम्या – 

….म्हणून शिक्षक उमेदवारांनी मुख्यमंत्र्यांना रक्तानं लिहिलं पत्र

मुंबईकरांसाठी खुशखबर! लोकल प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने घेतला ‘हा’ निर्णय

‘ज्या शिवसेनेने केलाय घात, त्यांचा..’ भाजप उमेदवाराच्या प्रचारात आठवलेंची खास शैलित शेरेबाजी

‘मला समन्स बजावला नाही’, ‘त्या’ चर्चांवर समीर वानखेडेंचं स्पष्टीकरण

ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्य सरकारने दिली एसटी कर्मचाऱ्यांना भेट; केली ‘ही’ मोठी घोषणा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More