बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“तुझ्या पुतण्यानं आमच्या मुलीला पळवलं”, महिलेचा विनयभंग करुन मारहाण

जालना | जालना येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घरातील मुलीचे एका मुलासोबत प्रेमसंबंध असल्याचं समजल्यावर लग्नाला नकार देण्यात आला. या कारणामुळे मुलीनं टोकाचं पाऊल उचललं, ज्याची शिक्षा मुलीच्या प्रियकराच्या कुटुंबियांंना भोगावी लागली आहे. या घटनेनंतर संपुर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

संबंधित घटना ही जालना जिल्ह्यातील सेलगाव येथील आहे. येथील रहिवासी असणाऱ्या एका महिलेचा विनयभंग करुन तिला बेदम मारहाण करण्यात आली आहे. संबंधित आरोपीचं नाव सोपान श्रीमंत लिपणे असं आहे. पीडित महिलेच्या पुतण्याचे आणि आरोपीच्या मुलीचे प्रेमसंबंध होते. मात्र ही गोष्ट घरात कळल्यानंतर त्यांच्या लग्नाला नकार देण्यात आला.

आपल्या लग्नाला नकार देण्यात आल्यामुळे आरोपीच्या मुलीने तिच्या प्रियकरासोबत गावातून पळ काढला. याच रागातून आरोपी आणि त्याच्या नातेवाईकांनी संबंधित प्रियकराच्या घरी जाऊन त्याच्या घरच्यांना बेदम मारहाण केली. 35 वर्षीय पीडित महिला सोमवारी सायंकाळी आपल्या घरासमोरील ओसरीत बाजेवर झोपली होती. यावेळी आरोपी पीडितेच्या घरी आला. यादरम्यान तुझ्या पुतण्यानं आमच्या मुलीला पळवून नेलं आहे; तो कुठे आहे? सांग म्हणत आरोपीनं पीडितेला शिवीगाळ करुन बेदम मारहाण केली आहे.

दरम्यान, आरोपी सोपान याने त्यांना जीवे मारण्याची धमकी देत घरासमोरील दुचाकीचं नुकसान देखील केलं आहे. या प्रकरणी पीडित महिलेनं आष्टी पोलीस ठाण्यात आरोपी सोपान श्रीमंत लिपणे विरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच पोलिसांनी आरोपीविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास जमादार एस.बी बिक्कड हे करत आहेत.

थोडक्यात बातम्या-

राष्ट्रवादीचे नेते डॉ. अब्दुल गफ्फार मलिक यांचं दु:खद निधन; राष्ट्रवादीचं आग्रही मुस्लिम नेतृत्व हरपलं

पुणे जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल एवढ्या नागरिकांना मिळाली कोरोना प्रतिबंधक लस

कोरोना नाही तर पुण्यात ‘या’आजाराचा धोका वाढला; पुण्यात आतापर्यंत 25 मृत्यु

आमदार रोहित पवारांचा ‘झिंगाट डान्स’, कोरोना रूग्णांसोबत धरला ठेका; पाहा व्हिडीओ

दिलासादायक! मुंबईची कोरोनामुक्तीकडे वाटचाल; सक्रिय रूग्णसंख्येसह नव्या बाधितांच्या संख्येत लक्षणीय घट

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More