बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आपण भाग्यवान म्हणून ड्रायव्हिंग लायसन्सवर आपला स्वतःचा फोटो आहे”

मुंबई | लसीकरणानंतर दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो दिला गेल्यानं विरोधकांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. याच मुद्द्यावरून काँग्रेसचे खासदार कुमार केतकर यांनी उपस्थित केलेल्या एका प्रश्नावर केंद्र सरकारने उत्तर दिलं होतं. लसीकरणाची जनजागृती करण्यासाठी लस प्रमाणपत्रावर पंतप्रधान मोदींचा फोटो दिल्याचं केंद्र सरकारने सांगितलं. त्यानंतर आता नितीन राऊत यांच्या कन्या दिक्षा राऊत यांनी नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे.

आपण स्वतःला भाग्यवान समजलं पाहिजे की, आपल्या ड्रायव्हिंग लायसन्सवर आपलाच स्वतःचाच फोटो आहे, असा टोला दिक्षा राऊत यांनी नरेंद्र मोदींना लगावला आहे. गेल्या काही दिवसांपासून दिक्षा राऊत राजकारणाचे धडे घेताना दिसत आहेत. त्यानंतर त्यांनी केलेले हे ट्विट अनेक लोकांनी लाईक केलं आहे.

नागरिकांमध्ये लसीकरणासाठी जनजागृती व्हावी ही केेंद्र सरकारची नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे हे प्रमाणपत्र मानक स्वरूपात तयार केलं असल्याचं केंद्र सरकारने सांगितलं होतं. त्यानंतर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत सरकारी पैशांचा गैरवापर मोदी सरकार करत आहे, असा आरोप केला आहे.

दरम्यान, जर जनजागृती करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो चालत असेल, तर मग राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा का नाही? महाराष्ट्रात लस घेणाऱ्या नागरिकांच्या प्रमाणपत्रावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोटो द्यावा, अशी टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली होती.

थोडक्यात बातम्या-

रानडे इंस्टिट्युटचा वाद शिक्षणमंत्र्याच्या दरबारी; रानडे इंस्टिट्युटला शनिवारी भेट देणार

कोरोनामुळे यंदाही गणेशोत्सव साधेपणानंच; भाविकांसाठी ऑनलाईन दर्शनाची होणार सोय

‘लोकशाहीच्या मंदिरात मार्शल लाॅ लावलाय’; राज्यसभेतील गदारोळानंतर राऊतांची टीका

‘मुख्यमंत्री तुम्हाला लाज वाटली पाहिजे’; महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

संभाजीराजेंना बोलू न दिल्यानं संजय राऊत भडकले, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More