बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘रूग्ण तडफडेल, तरी तुम्हाला अॅम्ब्युलन्स मिळणार नाही’; अॅम्ब्युलन्स मालकाची अरेरावी

सिंधुदुर्ग | सध्या सगळीकडे कोरोना रोगाची दुसरी लाट सुरू आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कोरोनाबाधित रूग्णांचा आकडा वाढत चालला आहे. अशात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अॅम्ब्युलन्स माघारी पाठवली म्हणून अॅम्बुलन्स मालकाने फोनकरून रुग्नाच्या कुटुंबियांना धमकावलं असल्याची विचित्र घटना घडली आहे.

देवगड तालुक्यातील अमोल बांदिवडेकर याला कोरोनाची लागण झाली असल्यानं, त्याला देवगडमधील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं होतं. अमोलला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यानं त्याला मुंबईच्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला तेथिल डॉक्टरांनी दिला.

देवगडहून मुंबईला जाण्यासाठी अमोलच्या घरच्यांनी एक 30 हजार भाडं असलेली अॅम्ब्युलन्स बुक केली. परंतू अॅम्ब्युलन्समध्ये  ऑक्सिजनचे एकच नळकांडे असून त्यात किती ऑक्सिजन आहे, याची माहिती ॅम्ब्युलन्स चालक तसेच अॅम्ब्युलन्स मालक विशाल जाधव यांना नव्हती. तसेच त्यामधील स्ट्रेचर खूप छोटा असून तो अॅडजेस्टेबलही नव्हता. या अशा अवस्थेमध्ये रूग्णाला एवढा लांबच्या प्रवासाने आणखी त्रास होईल या विचाराने अमोलच्या काकीने विशाल जाधव यांना फोन केला.

फोन करून त्यांना या सगळ्याची माहिती दिली आणि अॅम्ब्युलन्स माघारी पाठवली. याचा राग डोक्यात ठेऊन विशाल जाधव यांनी अमोलची काकी प्रणाली बांदिवडेकर यांना फोन करून असभ्य भाषा वापरली. तुमचा रूग्ण तडफडेल, तरी एकही अॅम्ब्युलन्स मिळणार नाही, तशी मी व्यवस्शा केली असल्याचंही त्यानं फोनवर सांगितलं. तसेच महिलेशी असभ्य भाषेत बोलणं, अॅम्ब्युलन्समध्ये रूग्णांसाठी उपयुक्त सोय न ठेवणं. या गोष्टींवरून मनसेनं या प्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि आरटीओ यांच्याकडे केली आहे.

थोडक्यात बातम्या- 

राज्यासाठी हे मुख्यमंत्री लायक नाहीत- नारायण राणे

तरुणांचा धिंगाणा सहन न झाल्याने एकाची हत्या; अहमदनगरमधील धक्कादायक घटना

कडक सॅल्यूट! पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानाची पत्नी झाली लेफ्टनंट

केंद्र सरकारकडून दिलेल्या वेळेची मर्यादा आज संपुष्टात; ‘या’ समाज माध्यमांवर कारवाई होणार?

‘यास’ चक्रिवादळाचा ट्रेलर, ताशी 150 कि.मी वेगानं धडकण्याची शक्यता ; पाहा व्हिडीओ

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More