बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आपली पोरं लय भारी! मराठमोळ्या अंदाजात मुंबई इंडियन्सचं नवं अँथम; पाहा व्हिडीओ

मुंबई | कोरोनामुळे आयपीएल सामने रद्द करण्यात आले होते. त्यानंतर अनेक खेळाडूंनी आयपीएलमधून माघार देखील घेतली. अशातच आता 2021 मधील आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचा थरार 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये रंगणार आहे. त्यातच आता गतविजेता संघ मुंबई इंडियन्सनं नवं अँथम शेअर केलं आहे.

‘महाराष्ट्राच्या प्रत्येक फॅमिलीचा अभिमान-मुंबई इंडियन्स’ अशा टायटलने हा व्हिडीओ शेअर केला आहे. हे अँथम मराठी भाषेत गायलं गेलं आहे. ‘आपली पोरं लय भारी’ हे अँथमचे बोल आहेत. चला पलटन आयपीएलमध्ये आपलाच आवाज होऊ द्या, असं मुंबई इंडियन्सने म्हटलं आहे.

शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये मुंबईचे दिग्गज खेळाडू नाचताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, ईशान किशन, सुर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, कृणाल पांड्या यांसारखे दिग्गज खेळाडू दिसत आहेत. यात खेळाडूंनी मराठमोळा फेटा देखील डौलाने बांधला आहे.

दरम्यान, आयपीएलचा पहिला सामना पाच वेळचा विजता संघ मुंबई इंडियन्स आणि तीन वेळचा विजेता संघ चेन्नई सुपर किंग यांच्यात रंगणार आहे. त्यामुळे आता सर्वच चाहते आतुरतेने आयपीएलची वाट पाहत आहेत.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

“महात्मा गांधींच्या आजूबाजूला महिला दिसायच्या मग भागवतांच्या का नाही?”

“उद्यापासून बदामाचा खुराक चालू करावा म्हणजे बुद्धीला लागलेला गंज कमी होईल”

तालिबान्यांमध्येच तांडव! नव्या सरकारमध्ये फूट, उपपंतप्रधानांनी काबूल सोडलं

“…तर मग आपले पोलीस सरकारने 100 कोटी मोजायला बसवलेत का?”

…तर विराट कोहली ट्रिपल सेंच्युरी मारणार; कपिल देव यांचं मोठं वक्तव्य

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More