बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘तुझी मर्जी म्हणजे तुुझा अधिकार होऊ शकत नाही’; उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

औरंगाबाद | मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या विस्तारीत इमारतीचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते उद्धाटन शनिवारी करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना केंद्र सरकारवर टीकेचे बाण सोडले आहेत. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संविधान बदलण्याच्या आरोपावर त्यांनी खरपूस समाचार घेतला आहे.

स्वातंत्र्याला 75 वर्ष झाल्याचं आपण सांगत आहोत. माझ्या आणि पुढील पिढ्यांना हे स्वातंत्र्य अनायसे मिळाले आहे. लढा द्यायचा होता तो मागील पिढीनं दिला आहे. आम्ही काहीही केलं नाही. त्याग या पिढीने केलेला आहे. आम्ही स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली म्हणून साजरी करत आहोत. पण हा स्वातंत्र्य महोत्सव आपल्याला चिरंतन टिकवायचा आहे, असं सांगतानाच विधी तज्ञ्जांनी देशाला मार्गदर्शन केलं पाहिजे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

तु पदावर आहेस म्हणजे तुझी मर्जी हा अधिकार होऊ शकत नाही. तुझा अधिकार वेगळा आणि तुझी मर्जी वेगळी हे कोणी तरी आम्हाला सांगितलं पाहिजे. मी सामान्यांच्या मनातील बोलत आहे. लवकरात लवकर तज्ञ्जांकडून या प्रकारावर प्रकाश पडेल याची मला आशाच नाही तर विश्वास आहे. घटनेची चौकट काय असते? त्या चौकटीत काम केलं तर मला वाटतं समाज, देश गुन्हे मुक्त होऊ शकतो, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

दरम्यान, या कार्यक्रमासाठी देशाचे सरन्यायाधीश ए.व्ही.रम्मना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री किरण रिजीजू, मंत्री भागवत कराड आणि अन्य न्यायमुर्ती आणि अधिकारी उपस्थित होते.

थोडक्यात बातम्या –

‘हे आमदार, खासदार सो कॉल्ड जी माकडं आहेत…’, उद्यनराजे संतापले

“आमच्याकडे तर तक्रारदारच गायब आहे”, मुख्यमंत्र्यांनी लगावला परमबीर सिंगांना टोला

‘आर्यन खानला गांजा दिला होता, पण….’, अनन्या पांडेचा मोठा खुलासा

‘…ते आपल्याला मोडून काढायचं आहे’, मुख्यमंत्र्यांचा ‘हा’ महत्त्वाचा निर्धार

देशातील कोरोना रूग्णसंख्येतील चढउतार सुरूच, पाहा गेल्या 24 तासातील आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More