Top News पुणे महाराष्ट्र

पक्षाला मिळालेल्या यशात आमचा थोडा तरी वाटा असेल ना?; सत्यजित तांबेंचं कार्यकर्त्यांची खदखद मांडणार पत्र

पुणे | महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन आता 7 महिने होत आलेले आहेत. राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये काँग्रेस पक्षाचे पालकमंत्री, तर सर्वच 36 जिल्ह्यांत आपण पक्ष संघटनेच्या कामाच्या समन्वयासाठी संपर्क मंत्री नेमलेले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये शासकीय समित्यांचे गठन करण्याचे काम सुरू झाले आहे. परंतु तक्रारी येत आहेत की, काँग्रेस कार्यकर्यांना उचित स्थान दिले जात नाही . तरी मी आपणास कळकळीची विनंती करतो की, आपण मंत्रीमंडळातील आपल्या सर्व सहकारी मंत्र्यांना, ते जिथे पालकमंत्री अथवा संपर्क मंत्री असतील तेथे जिल्हास्तरीय तसेच तालुकास्तरीय शासकीय समित्यांमध्ये प्रत्येक समितीत युवक काँग्रेसला स्थान देण्यात यावे, अशा स्पष्ट सूचना देण्यात याव्यात, अशी विनंती युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे.

महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाच्या संघटना बांधणीचे काम युद्धपातळीवर सुरू होणे गरजेचे आहे, या प्रक्रियेतून पक्षाला पुन्हा एकदा सुगीचे दिवसआणण्यामध्ये युवक काँग्रेस महत्त्वाची भूमिका पार पाडू शकते. 2019 च्या विधानसभा निवडणूकीत युवक काँग्रेसने जीवाचे रान करून पक्षाच्या उमेदवारांचे काम केले. युवकांचा जाहीरनामा, सुपर 60, वेक अप महाराष्ट्र यासारखे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले, पक्षाला जे काही यश मिळाले आहे, यात युवक काँग्रेसच्या प्रयत्नांचा थोडा तरी वाटा असेल की नाही?, असा सवाल त्यांनी या पत्राच्या माध्यमातून विचारला आहे.

सध्या देखील कोरोनाच्या संकटात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी स्वखर्चातुन लाखो निराधार लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने हेल्पलाइनच्या माध्यमातून आधार देण्याचे काम केले. 16 हजारपेक्षा अधिक रक्ताच्या बाटल्या गोळा करून, एक विक्रमच केला आहे. जर युवक काँग्रेस संघटना पूर्णपणे झोकून देऊन काम करत असेल तर वरिष्ठ नेत्यांनी देखील त्यांची ‘पाठ थोपटून’ शाबासकी द्यावी, हीच आमची माफक अपेक्षा आहे, असंही सत्यजित तांबेंनी पत्रात म्हटलं आहे.

मी स्वतः सर्व काँग्रेस पक्षाच्या मंत्री महोदयांना राज्यातील सर्व युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांची यादी फोन नंबरसह पोहोच केलेली असून जिल्ह्यांमध्ये होणाच्या जिल्हास्तरीय तसेच तालुकास्तरीय शासकीय समित्यांमध्ये युवक काँग्रेसला प्रतिनिधीत्व देण्याची मागणी केलेली आहे. ह्या सोबतच मंत्रीमहोदयांनी दौरा करीत असतांना संबंधित जिल्ह्यांमधील युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांना निरोप देऊन सोबत ठेवण्याच्या दृष्टीने ही यादी मी सर्व मंत्री महोदयांकडे स्वतः ६ महिन्यांपूर्वीच सुपूर्द केली आहे, असंही त्यांनी पत्रात नमूद केलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

‘जे परीक्षा न देताच मुख्यमंत्री झाले त्यांनी…’; निलेश राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

…अन् मीच पास झालो अशी मला फिलिंग आली, राज्यमंत्री तनपुरेंचं विद्यार्थ्यांना खास पत्र

महत्वाच्या बातम्या-

“मुंबई-महाराष्ट्रात बेड्सची पुरेशी संख्या, कोरोनाचा सामना करण्यास ठाकरे सरकार खंबीर”

केंद्राच्या कॅबिनेट बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा

पृथ्वीबाबांचा मोदी अन् ठाकरे सरकारला ‘हा’ महत्त्वाचा सल्ला…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या