मृत नागरिकांना राष्ट्रवादीची श्रद्धांजली, नोटाबंदीचा निषेध!

औरंगाबाद |  नोटाबंदीच्या निर्णयानंतर मृत्यू झालेल्या लोकांच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम औरंगाबादमध्ये पार पडला. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसकडून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीच्या निर्णयाची घोषणा केल्यानंतर हजार आणि पाचशेच्या रद्द झालेल्या नोटा बदलून घेण्यासाठी बँकांपुढे नागरिकांची झुंबड उडाली होती. या रांगेत उभे असताना अनेकांना आपले प्राण गमवावे लागले होते.

दरम्यान, या मृतांना राष्ट्रवादीकडून श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच नोटाबंदीच्या निर्णयाचा निषेधही व्यक्त करण्यात आला.