मुंबई | भारतात गुगलची ई-मेल सेवा म्हणजेच जीमेल अचानक बंद झाली आहे. ई-मेलसोबतच यू-ट्यूब, गुगल, गुगल ड्रायव्हदेखील डाऊन झाल्यामुळे अनेक युजर्सला मनस्तापाला सामोरे जावं लागत आहे.
सध्या कोरोना संकटामुळे अनेक युजर्स वर्क फ्रॉम होम करत असल्याने त्यांना जीमेल, गुगल ड्रायव्ह, यूट्यूब यांची गरज भासते. मात्र अचानक या सर्व सेवा बंद पडल्यामुळे यूजर्स त्रस्त झाले आहेत.
डाऊन झालेली गूगलसेवा 45 मिनीटानंतर पूर्ववत सुरू झाली आहे. अद्याप सेवा ठप्प होण्याचं कारण गूगलकडून स्पष्ट करण्यात आलेलं नाही.
सुमारे पाऊण तास गूगलसेवा ठप्प होती. सोमवारी सायंकाळी 5.30 नंतर अडथळा येऊ लागला. त्यानंतर रिफ्रेश करूनही माहिती अपडेट होत नसल्याचं दिसून आलं. युजर्सकडून डाऊन झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या.
थोडक्यात बातम्या-
आंदोलन की पिझ्झा पार्टी म्हणणाऱ्या ट्रोलर्सला दिलजीत दोसांजचं उत्तर, म्हणाला…
…म्हणून मी राजकारणात येण्याच्या योग्यतेची नाही- अमृता फडणवीस
“पाकिस्तानी क्रेडिट कार्ड बाळगणाऱ्यांनी तानाजी मालुसरे यांच्याशी तुलना करू नये”
“…तर बाळासाहेब ठाकरेंनीच प्रताप सरनाईकांचा कडेलोट केला असता”
“एकाही मावळ्याचं नाव घ्यायच्या लायकीचे नाहीत सरनाईकसारखी माणसं”