खेळ

युजवेंद्र चहल लवकरच अडकणार लग्नबंधनात, घरच्या घरी साखरपुडा सोहळा संपन्न

मुंबई | भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल अखेर लग्नाच्या बंधनात अडकण्यासाठी तयार झाला. शनिवारी त्यानं साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. त्यानं कुटुंबीयांच्या सहमतीनं आम्ही एकमेकांना ‘हो’ म्हणत आहोत, असं ट्विट चहलने केलंय.

YouTuber धनश्री वर्मा आणि चहलचा घरच्या घरी छोटेखानी साखरपुडा सोहळा संपन्न झाला आहे. धनश्रीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ही आनंदाची बातमी दिली आहे. धनश्रीने ही बातमी सोशल मीडियावर सांगितल्यानंतर दोघांवरही शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे.

अनेकांना चहल आणि धनश्री वर्माच्या या बातमीने आश्चर्याचा धक्का बसला आहे. लॉकडाउन काळात चहल घरात बसून आपल्या परिवारासोबत वेळ घालवत होता. अनलॉक काळात चहलने सरावासाठी सुरुवात केली असून तो लवकरच आयपीएलच्या तेराव्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून खेळताना दिसेल.

युजवेंद्रनं 2016 मध्ये भारतीय संघात पदार्पण केले. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये तो भारतीय संघाचा प्रमुख फिरकीपटू आहे. त्यानं आतापर्यंत 52 वन डे आणि 42 ट्वेंटी-20 सामन्यांत अनुक्रमे 91 व 55 विकेट्स घेतल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

राज्यात आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ; दिवसभरात ‘इतक्या’ हजार कोरोनाबाधितांची नोंद

कोल्हापुरात खासगी रुग्णालयाला सरकारी ऑडिटरचा दणका, रुग्णाच्या बिलात ‘इतक्या’ लाखांची केली कपात

“मराठा समाज आरक्षण उपसमितीवरून अशोक चव्हाण यांना हटवून या नेत्याची नियुक्ती करा”

‘गर्व असणारच, मुलगा आहे माझा’; केरळ अपघातात मरण पावलेले पायलट दीपक साठे यांच्या आईची प्रतिक्रिया

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात चौथऱ्यावरुन हटवला; सोशल मीडियावर संताप

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या