बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

क्रूरतेचा कळस! YouTuber ने कुत्र्याला फुगे बांधून हवेत उडवलं, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | प्रसिद्धीसाठी लोक कोणत्या थरावर जातील काही सांगता येत नाही. टिकटाॅक, इन्स्ट्राग्राम रिल्स, युट्युब यांसारख्या प्लाॅटफाॅमसाठी अनेक लोक व्हिडीओ तयार करतात, त्यातील काही जण कमी वेळातच प्रसिद्धीस पोहोचतात. व्हिडीओतील कंटेटसाठी लोक वेगवेगळ्या गोष्टी वापरतात. यातच आता दक्षिण दिल्लीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

गौरव शर्मा या 32 वर्षीय युट्युबरने एक व्हिडीओ बनवला आहे. ज्यामध्ये त्याने हेलियमच्या फुग्यांना एका पाळीव कुत्र्याला बांधले होते. फुगे हवेत सोडल्यानंतर कुत्रा देखील हवेत उडू लागला होता आणि त्यामुळे त्याचा जीव धोक्यात आला होता. 21 मे रोजी शूट करण्यात आला होता. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गौरव गुप्ता या सामाजिक कार्यकर्त्यांने पुढाकार घेत पोलिसात तक्रार नोंदवली आहे.

सामाजिक कार्यकर्ता गौरव गुप्ता हे पीपल्स फॉर अॅनिमल्स सोसायटी या संस्थेसाठी काम करतात. गौरव गुप्ता यांनी गौरव शर्मा याच्याविरूद्ध मालवीय नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी या युट्यूबरला अटक केली आहे. युट्यूबर असल्यानं हा व्हिडीओ तयार केला होता असं आरोपीनं सांगितलं आहे.

दरम्यान, आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि कलम 11 (1) (ए), भादवी कलम 188, आणि कलम 11 (1) (डी) पशु क्रूरता प्रतिबंधक कायदा या अंतर्गत पी.एस. मालवीय नगर याठिकाणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

नदीवर पाणी प्यायला गेलेल्या कुत्र्यावर मगरीनं केला हल्ला अन्…, पाहा व्हिडीओ

लॉकडाऊनचं काय करायचं?; कॅबिनेट मंत्र्यांनाच कळेना,कुणी म्हणतंय वाढवावा, कुणी म्हणतंय नको!

शरद पवारांचे सरकारला पुर्ण आशिर्वाद, हे सरकार 5 वर्ष चालेल- संजय राऊत

“मृतदेहांवरून राजकारण कसं करावं हे माणसातील गिधाडांकडून शिकावं”

शरद पवार अॅक्शन मोडमध्ये; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीचे नेते पवारांच्या भेटीला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More