Yugendra Pawar। बारामती लोकसभा मतदारसंघाकडे केवळ राज्य नाहीतर अवघ्या देशाचं लक्ष लागलं होतं. बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद विरूद्ध भावजय अशी लढत होती. बालेकिल्ला हा शरद पवार यांचा बालेकिल्ला आहे. त्याच बालेकिल्ल्यातून शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांना भरघोस मतदान करून बारामतीकरांनी विजय मिळवून दिला. याच पार्श्वभूमीवर बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या समर्थकांनी बॅनरबाजी केली आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांचे पुणे, बारामती तसेच बारामती मतदारसंघामध्ये जंगी स्वागत करण्यात आलं होतं. त्यानंतर लोकसभा निवडणुकीचा निकाल झाल्यानंतर आता राज्याला विधानसभेचे वेध लागले आहेत. राज्याच्या राजकारणात राजकीय नेत्यांनी विधानसभा निवडणुकीकडे लक्ष द्यायला सुरूवात केली आहे. अशातच बारामतीत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बारामतीचे आमदार अजित पवार यांच्याविरोधात बॅनरबाजी केली आहे. त्याची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
“वादा तोच दादा नवा”, युगेंद्र पवारांच्या बॅनरबाजीची चर्चा
बारामतीत सुप्रिया सुळेंच्या विजयाची बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्यामध्ये एका बाजूला सुप्रिया सुळे त्यामागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार, युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांचा फोटो बॅनरमध्ये लावण्यात आला आहे. त्याखाली ‘वादा तोच दादा नवा’, अशा आशयाची टॅगलाईन युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांच्या फोटोखाली लिहिण्यात आली आहे. त्या बॅनरजी सध्या जोरदार चर्चा होताना दिसत आहे. (Yugendra Pawar)
अजित पवार यांनी आपल्या काकांची साथ सोडून भाजपसोबत हातमिळवणी केल्याने मतदारांच्या मनामध्ये द्वेष आहे. याचं उत्तर हे लोकसभा निवडणुकीत मतदारांनी दिलं आहे. अशातच आता सुप्रिया सुळे यांच्या विजयाचे बॅनर बारामतीमध्ये लागले असता, त्याच बॅनरबाजीच्या माध्यमातून अजितदादांना डिवचलं गेल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार यांच्यात लढत पाहायला मिळाली होती. अनेकांचं लक्ष या लढतीकडे होतं. अजित पवार आणि शरद पवारांच्या प्रतिष्ठेची लढत पाहायला मिळाली होती. यामध्ये दोन्ही बाजूने जोरदार प्रचार सुरू होता. मात्र अखेर बारामतीकरांनी सुप्रिया सुळे यांना बहुमतांनी विजयी करून दिलं आहे. (Yugendra Pawar)
सुप्रिया सुळेंचा मताधिक्याने विजय
सुप्रिया सुळेंना 1 लाख 53 हजार 960 मतांनी विजय मिळवला आहे. यामध्ये बारामती विधानसभेतूनही सुप्रिया सुळेंनी आघाडी घेतली होती. तसेच खडकवासला मतदारसंघातून सुप्रिया सुळे 21 हजार मतांनी पिछाडीवर होत्या. मात्र इतर सर्व मतदारसंघातून सुप्रिया सुळेंनी आघाडी घेतली होती.
News Title – Yugendra Pawar banner Against Ajit Pawar At Baramati Vidhansabha News Update
महत्त्वाच्या बातम्या
लहान मुलांमधील लठ्ठपणा ठरू शकतो धोकादायक; काय काळजी घ्याल?
राज्यात मॉन्सून दाखल, शेतकऱ्यांनी पेरणी कधी करावी?, हवामान विभागाकडून महत्वाचा सल्ला
“देवेंद्र फडणवीस पळणारा माणूस नाही, मी निराश झालो असं समजू नका”
मोठी बातमी! बच्चू कडू यांचा महायुतीला धक्का, घेतला सर्वात मोठा निर्णय
‘अॅनिमल’ फेम तृप्ती डीमरीने मुंबईत घेतलं आलिशान घर; किंमत कोटींच्या घरात