Ajit Pawar | महाविकास आघाडीच्या मेळाव्यात भाषण करताना ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊतांनी भाजप, मोदी आणि अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी बोलताना संजय राऊतांनी अजित पवारांना गुलाबी सरडा म्हटलं होतं. या टीकेवर अजित पवारांचे (Ajit Pawar) पुतणे युगेंद्र पवार यांनी भाष्य केलंय. युगेंद्र पवारांनी या टीकेवर आक्षेप घेतला आहे.
“शेवटी अजित पवार माझे काका”
कितीही झालं तरी अजित पवार (Ajit Pawar) हे माझे काका आहेत, अशी टीका करणं योग्य नाही, असं युगेंद्र म्हणालेत. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
युगेंद्र पवार म्हणाले, मी खाली बसलो होते. ते स्टेजवर बसले होते. ते काय बोलती यावर आमचा कंट्रोल नाही. काही गोष्टीत ते बोलतील ते सगळच आम्हाला आवडते किंवा पटते असे नाही. कारण शेवटी कौटुंबिक संबंध देखील आहेत.
बारामतीमध्ये निवडणूक कोण लढणार हे ज्यावेळी आम्हाला महाविकास आघाडीमध्ये जागा सुटेल त्यानंतर ठरेल. सध्या उमेदवार ठरलेला नाही त्यामुळे त्याबाबत मी बोलणार नाही, असं त्यांनी म्हटलंय.
जय पवार सोबत अद्याप माझं बोलणं झालेला नाही मात्र तो निवडणूक लढणार असेल तर शुभेच्छा… एवढ्या दिवसांचा मतदार संघ त्यांना का सोडावा लागतोय याचं उत्तर तेच देऊ शकतात, असं युगेंद्र पवार म्हणाले.
संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
सुप्रिया सुळे या महाराष्ट्राची लाडकी बहीण आहेत. या बहिणीसाठीच बारामतीत महाराष्ट्र लढला. तुमच्या लाडक्या भावाने तर आता रंग बदलला आहे. ते पिंक झाले आहेत. सरडा रंग बदलतो. पण तो अचानक पिंक कसा होऊ शकतो? असा सवाल राऊतांनी केला. गुलाबी रंग हा महाराष्ट्राचा रंग नाही. महाराष्ट्राचा रंग भगवा आणि तिरंगा आहे. केसीआर यांनी तेलंगणात गुलाबी रंग घेतला. त्यांचा पराभव झाला. हे सुद्धा जातील, असा टोलाही राऊतांनी अजित पवारांना लगावला.
महत्त्वाच्या बातम्या-
एअर इंडियामध्ये नोकरीची मोठी संधी; दहावी पासही करू शकतात अर्ज
रेल्वे विभागात नोकरी करण्याचं स्वप्न होणार साकार! ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज
सुप्रियाच्या लाडक्या भावाने रंग बदलला, आता ते पिंक झाले
‘कांतारा’ ते KGF…70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत साउथ इंडस्ट्रीची बाजी; पाहा विजेत्यांची यादी
‘देवाची नव्हे तर नवऱ्याची कृपा म्हणून मुलं होतात!’ अजित पवारांचं वक्तव्य