Baramati | बारामतीत महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने युगेंद्र श्रीनिवास पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे बारामतीत पुन्हा काका विरुद्ध पुतण्या असा सामना रंगणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांच्यात ही निवडणूक रंगणार आहे.
युगेंद्र पवार यांचे वडिल आणि अजित पवारांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवारांनी मुलासाठी प्रचाराचा नारळ फोडला. लेकासाठी बाप मैदानात उतरला असून भावाविरुद्ध दंड थोडपले आहेत. सख्खे भाऊ एकमेकांच्या विरोधात बारामीत पाहायला मिळणार आहेत.
Baramati मध्ये सख्खे भाऊ एकमेकांच्या विरोधात
बारामती विधानसभेकरिता उद्या सोमवार रोजी यूगेंद्र पवार राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये अर्ज दाखल करणार आहेत. परंतु, त्या आधीच श्रीनिवास पवार यांनी युगेंद्र पवारांच्या प्रचाराची सुरुवात केल्याचं पाहायला मिळालं.
Yugendra Pawar काय म्हणालेे?
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर युगेंद्र पवार म्हणाले की, उमेदवारी मिळाल्याबद्दल मनापासून आनंद होत आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी माझ्यावर आत्मविश्वास दाखवला, विश्वास ठेवला त्याबद्दल मी मनापासून त्यांचे आभार मानतो. यापुढे बारामतीच्या जनतेसाठी आणि सर्वसामान्यांसाठी लोकप्रतिनिधी म्हणून काम करेल, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी 100 टक्के प्रयत्न करेन, अशी ग्वाही युगेंद्र पवार यांनी दिली.
दोन-तीन दिवसांनी शरद पवार यांच्याशी चर्चा करून पक्षाशी बोलणे झाल्यावर सर्वांना विश्वासात घेऊन उमेदवारी अर्ज दाखल भरण्याची तारीख ठरेल, असंही ते म्हणाले.
महागाई, भ्रष्टाचार, पाण्याचा प्रश्न, शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव, बेरोजगारी, वाड्या वस्तूंवरील पाण्याचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न, वैयक्तिक प्रश्न ही कामे मार्गे लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ प्रसिद्ध सोशल मीडिया स्टारचा मित्रासोबतचा प्रायव्हेट व्हिडीओ व्हायरल!
शरद पवार गटाची अंतिम यादी जाहीर; धनंजय मुंडेंविरुद्ध ‘हा’ नेता लढणार
‘…तर तुम्हाला एवढं झोंबलं का?’; राधाकृष्ण विखे थोरातांवर कडाडले
अजित पवार गटाच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; लंकेंविरोधातला उमेदवार ठरला
‘राजकारणातील टरबुज्या…’; बड्या नेत्याचा सर्वात मोठा गौप्यस्फोट