बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चहलच्या बायकोने केली धोनीच्या ‘हेलिकॉप्टर शॉट’ची COPY अन्…; पाहा व्हिडीओ

मुंबई | भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल (Yujvendra Chahal) याची पत्नी धनश्री (Dhanashree Chahal) नेहमी सोशल मीडियावर ॲक्टीव्ह असल्याचं पहायला मिळालं आहे. अनेकवेळा ती युजवेंद्र चहल याच्यासोबतचे डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर टाकत असते. त्यामुळे धनश्री नेहमी चर्चेत असते. आता धनश्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, मात्र यावेळी तिच्या चर्चेत येण्यामागचं कारण वेगळं आहे.

धनश्री हिने जाहिरातीसाठी एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये तिच्या हातात बॅट असून ती बॅटींगमधील वेगवेगळे शॉट्स खेळत आहेत. यामध्ये तिने धोनीचा हेलिकॉप्टर शॉट देखील मारून दाखवला आहे. याशिवाय स्केअर कट, स्ट्रेट ड्राईव्ह, हुक शॉट असे अनेक शॉट्सही तिने खेळले आहेत.

मात्र,  या व्हिडीओवरून नेटकऱ्यांनी धनश्रीला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं आहे. काहींनी कमेंट्समध्ये आधी बॅट तर नीट पकडायला शिक असं म्हटलं आहे. तर काहींनी चहलला डान्स शिकवला मग चहलने बॅटींग नाही शिकवली का? असे  भन्नाट प्रश्न विचारले आहेत. जाहिरातीसाठी बनवलेल्या या व्हिडीओमुळे धनश्री चांगलीच ट्रोल झाली आहे.

दरम्यान, धनश्रीने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये खेळ मुलं किंवा मुली यांचा नाही तर स्टॅमिन्याचा असतो, असं म्हटलं आहे. धनश्रीने हा व्हिडीओ एका प्रोडक्टच्या जाहिरातीसाठी बनवला आहे. धनश्री स्वत: एक उत्तम डान्सर असून ती सतत सोशल मीडियावर तिचे डान्स व्हिडीओ टाकत असते. तिने अनेक हिंदी गाण्यांमध्ये देखील काम केलं आहे.

पाहा व्हिडीओ-

 

थोडक्यात बातम्या-

बंपर ऑफर! iPhone 12 Pro वर मिळतोय सर्वात मोठा डिस्काउंट

चिंताजनक! पुणे-मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा; ‘ही’ गोष्ट ठरतेय कारणीभूत

भावाची हवा! पेट्रोल महागलं म्हणून पठ्ठ्या थेट घोड्यावर निघाला काॅलेजला

शिवसेनेचा मनसेला दे धक्का! राज ठाकरेंच्या दौऱ्याआधीच मनसेला मोठी खिंडार

तुमचेही केस गळतात का? मग ‘या’ लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More