बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मुझे वो दिन आज भी याद है जब…’; युसूफने शेअर केला भावूक व्हिडिओ

नवी दिल्ली | भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू युसूफ पठानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतला. 2011 मध्ये भारताने जिंकलेल्या विश्वचषक मालिकेत युुसूफ पठान सामिल होता. विश्वचषक जिंकवण्यात युसूफचा महत्वाचा वाटा होता. मोक्याच्या क्षणी युसूफने विकेट काढले त्याच बरोबर संघाच्या गरच असेल तेव्हा देखील दमदार फलंदाजी देखील केली होती. संन्यास घेताना युसूफने फेसबुकवर एक भावूक व्हिडीओ टाकला आहे.

मुझे वो दिन याद है जब मैने पहली बार इंडिया की जर्सी पेहनी, असं म्हणत युसूफने जुन्या आठवणींना उजाळा दिला.  लहानपणापासून माझं आयुष्य एकाच गोष्टीभोवती फिरत आहे ते म्हणचे क्रिकेट. या काळात मी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय यांसारखे अनेक खेळ खेळलो पण आज वेगळा दिवस आहे, असं युसूफने सांगितलं आहे.

2007 आणि 2011 मध्ये विश्वचषकात भारतीय संघाचा भाग असताना खूप अनुभव आले. कोलकत्ता नाईट रायडर्स कडून  खेळताना लोकांनी भरपूर प्रेम दिलं त्याबद्दल युसूफने त्यांचे आभार मानले. इरफानने पुढे काय? असा प्रश्न केला तेव्हा भरपूर प्लॅन आहेत, असं उत्तर युसूफने दिलं. वेगवेगळ्या प्रकाराच्या माध्यामातून मनोरंजन करत राहिल, असंही तो म्हणाला.

भारताचे प्रतिनिधित्व करताना मला नेहमी अभिमान वाटायचा. मी माझे राष्ट्रीय, घरगुती, आयपीेएल संघातील प्रशिक्षक, सहाय्यक कर्मचारी आणि माझ्या हितचिंतकांचे आभार मानतो. मी सर्व प्रकारच्या खेळातून निवृत्ती घेतं आहे, असं युसूफ म्हणाला.

पहा व्हिडीओ- 

थोडक्यात बातम्या-

खळबळजनक! पुण्यात पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

पठ्ठ्यानं पेट्रोल पंपावर भरलं डिझेल अन् केलं असं काही की…

6 महिन्यांच्या तीरा कामतला अखेर ‘ते’ 16 कोटींचं औषध मिळालं!

…तर तुम्ही दिल्लीच्या तख्तावर टेकू शकला असता का?- उद्धव ठाकरे

भारताच्या पराक्रमी लेकीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, ‘या’ पदावर नियुक्ती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More