बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भावाची हवा! पेट्रोल महागलं म्हणून पठ्ठ्या थेट घोड्यावर निघाला काॅलेजला

औरंगाबाद | सध्या पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीने सामान्य माणसांच कंबरड मोडलं आहे. त्यामुळे आता नागरिकांनी वाहनांचा वापर देखील कमी केला आहे. मात्र आता एका पठ्ठ्याने चक्क पेट्रोल परवडत नाही म्हणून घोड्यावरूनच फिरायला सुुरुवात केली आहे. शेख युसूफ शेख ताजोद्दीन असं या पठ्ठ्याचं नाव आहे. औरंगाबाद येथे हा सर्व प्रकार घडला आहे.

शेख युसूफ हे एका महाविद्यालयात लॅब टेक्निशियन म्हणून काम करतात. त्यांचं महाविद्यालय हिमायतबागेजवळ आहे आणि घर मिटमिट्यात घरापासून महाविद्यालयाचं अंतर हे 15 किलोमीटर आहे. यूसूफ रोज महाविद्यालयात जाण्यासाठी घोड्याचाच वापर करतात. त्यांनी घोड्याचं नाव जिगर ठेवलं आहे.

याबाबत युसूफ यांनी सांगितले, काही दिवसांपूर्वी पेट्रोलच्या किंमती वाढल्या. त्यामुळे घोड्याचा वापर करण्याची कल्पना माझ्या डोक्यात आली. त्यामुळे मी एक काठीयावाडी घोडा विकत घेतला. हाच तो जिगर. आता कामावरच नाही तर इतर कुठेही जाताना मी याच घोड्यानं प्रवास करतो, असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, युसूफ यांनी सांगितले, या घोड्यासाठी रोज 50 रुपये खर्च होतो. त्यामध्ये दिवसभरात कुठेही कितीही वेळ फिरता येते. आमचा जिगर ताशी 40 ते 50 किमी धावतो. सुरुवातीला लोक थट्टा करायचे. पण आता अनेकजण ओळखीचे झालेत. शाळेत मला विद्यार्थी घोडेवाले मामा म्हणतात, असं युसूफ यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘माझ्यावरचे ‘ते’ आरोप बिनबुडाचे’, कंगनाची उच्च न्यायालयात धाव

बर्ड फ्लूचं सावट; सरकारनं दिले बदक आणि कोंबड्या मारण्याचे आदेश

“बाबरीच्या निकालानंतर आम्ही पार्टी केली, वाईनची बॉटल घेतली आणि…”

नरेंद्र मोदींना पर्याय कोण?, काँग्रेस नेते कन्हैय्या कुमार म्हणतात…

कोरोना अपडेट! राज्याच्या आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात वाढ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More