बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

युवासेना आक्रमक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिला थेट इशारा

मुंबई | शिवाजी पार्कवर दसरा मेळावा नेमका कोणाचा यावरुन सध्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. शिंदे गट आणि शिवसेना दोन्ही पक्ष शिवाजी पार्कवरच मेळावा घेणार असल्याचा दावा करत आहेत. त्यात आता युवासेनेनेपण या वादात उडी घेतली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार असल्याचं सांगितलं. पर्याय म्हणून शिवसेनेनंसुद्धा बीकेसी मैदानासाठी (BKC Grounds) MMRDA ला पत्र लिहलं आहे. त्यामुळे दोन्हीकडे दसरा मेळ्याव्याची तयारी सुरु आहे.

सत्तेचा दुरपयोग करुन जर शिंदे गटाने शिवतर्थावर मेळावा घेतला तर अख्खं मैदान कुदळ फावड्याने उखडून टाकू, असा थेट इशारा युवासेनेचे राज्य विस्तारक शरद कोळींनी (State Extension Sharad Koli) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिला आहे.

दरम्यान, या वक्तव्यानंतर राजकारण अधिक तापण्याची शक्यता आहे. आता या इशाऱ्याला शिंदे गटा काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या

“देवी-देवताच मला म्हणाले, डोन्ट वरी! जा भाजपमध्ये”

‘हे अकार्यक्षमतेचेच प्रदर्शन’, वेदांता प्रकल्पावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More