बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

युवा सेनेची ‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ विषयावर लघुपट स्पर्धा!

मुंबई  | कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ ही राज्य सरकारची मोहीम महत्त्वपूर्ण ठरत आहे. हाच विषय घेऊन युवा सेनेने लघुपट स्पर्धा आयोजित केली आहे.

युवा सेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून विनाशुल्क आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱया स्पर्धकांना तीन मिनिटांचा लघुपट बनवावा लागेल.

लघुपटासाठी मोबाईल किंवा कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण करता येईल. व्हिडीओचा आवाज उत्तम दर्जाचा असावा असे आयोजकांनी सांगितलं आहे. या स्पर्धेसाठी प्रवेश स्वीकारण्याची तारीख 25 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांकाला 50 हजार, द्वितीय क्रमांकाला 30 हजार आणि तृतीय क्रमांकाला 20 हजार रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

धक्कादायक! सॅनिटायझरने पेट घेतल्याने ‘राष्ट्रवादी’च्या नेत्याचा गाडीत होरपळून मृत्यू

धोनी चिडला… अन् ते पाहून अंपायरनं चक्क आपला निर्णयच बदलला

पुढील तीन दिवस जोरदार पावसाने; महाराष्ट्राच्या ‘या’ भागातील नागरिकांनी सावध राहा

बीडमध्ये धक्कादायक घटना; ट्रॅक्टर ड्रायव्हरकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More