नाशिक महाराष्ट्र

माजी खासदाराची नात आणि आमदार कन्येला युवक काँग्रेसनं केलं सरचिटणीस

नाशिक | महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्यकारिणीचा नुकताच विस्तार करण्यात आला आहे. यामध्ये पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये घराणेशाही जपण्याचा प्रयत्न झाल्याचं दिसतंय.

माणिकराव गावित यांची नात आणि आमदार निर्मला गावित यांची कन्या जिल्हा परिषद उपाध्यक्ष नयना गावित यांची युवक काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी हा विस्तार केला आहे. यामध्ये राज्यातील 12 युवकांना सरचिटणीपदी नियुक्त करण्यात आलं आहे.

दरम्यान, सत्तेतून बाहेर असूनही काँग्रेस त्याचत्याच घराण्यातील व्यक्तींना पदं देत आहे. त्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पहायला मिळतेय. 

महत्वाच्या बातम्या-

-राज ठाकरेंच्या व्यंगचित्राला भाजपचं व्यंगचित्रातूनच प्रत्युत्तर

कुलदीपनं असे चेंडू टाकले की न्युझिलंडचे खेळाडू त्याच्या तालावर नाचले!

‘या’ मंत्री वाचू शकल्या नाहीत मुख्यमंत्र्यांचा संदेश, म्हणाल्या यापुढे कलेक्टर वाचतील

-महाराष्ट्र पेटवणार; पुरंदरेंना पद्मविभूषण दिल्यानं आव्हाडांचा इशारा

न्युझीलंडविरुद्ध ही कामगिरी फक्त सेहवागला जमली आणि आता हिटमॅनला!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या