युवराज सिंग आणि गौतम गंभीरला मोठा झटका; IPL संघांमधून हकालपट्टी

मुंबई | आयपीएल 2018 मध्ये पाण्यासारखा पैसा आेतूनही पंजाबला म्हणावं तसं यश मिळवता आलं नाही. त्यामुळे पंजाब संघ व्यवस्थापनाने संघात मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

पंजाबने 2019 साठी संघात फक्त 9 खेळाडूंना कायम ठेवले आहे. तर 12 खेळाडूंना घरचा रस्ता दाखवला आहे. यात सिक्सर किंग युवराज सिंग आणि अॅराॅन फिन्च या खेळाडूंचा समावेश आहे.

युवराजची सध्याची खेळी पाहता त्याची कारकीर्द जवळपास संपुष्टातच आली आहे. कारण, गेल्या आयपीएलमध्ये त्याच्यावर बोली लावण्यास कुणीच उत्सुक नव्हतं.

दरम्यान, दिल्ली डेअरडेविल्सनेही गौतम गंभीरला घरचा रस्ता दाखवत संघात मोठे बदल केले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-नेते आणि अधिकाऱ्यांची मुलं सैन्यात का नाहीत; शहीद गोसावींच्या मामांचा सवाल

-आणखी एका शेतकरी महिलेनं स्वतःचं सरण रचून आयुष्य संपवलं

-झोपडपट्टीतील लोक सोबत असतात, तेव्हा जिंकण्याची खात्री असते!

-सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांवर भडकले रामदास आठवले

-#MeToo | भाजपच्या बड्या नेत्यावर लैंगिक शोषणाचे आरोप