युवराजची बॅट तळपली, मात्र हैदराबादचा दिल्लीकडून पराभव

दिल्ली | दिल्लीविरुद्धच्या सामन्यात युवराज सिंहची बॅट तळपली, मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. दिल्लीने हैदराबादवर ६ गडी राखून विजय मिळवला.

हैदराबादने दिल्लीला विजयासाठी १८६ धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान दिल्लीच्या फलंदाजांनी सहजरित्या पार केलं. दिल्लीच्या सर्वच फलंदाजांनी या विजयास हातभार लावला. तत्पूर्वी, युवराजच्या जबरदस्त खेळीने फिरोजशहा कोटलावर प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारणं फेडलं. त्याने ४१ चेंडूत नाबाद ७० धावांची खेळी केली.