बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘माझ्या बहिणीपासून लांब रहा’; ‘त्या’ वेळी रोहितला युवराज सिंहने दिली होती धमकी!

मुंबई | भाऊ-बहिणींच नातं अधिक वृद्धिगंत करण्यासाठी रक्षाबंधनाचा सण देशभरात साजरा केला जात आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण भावाला राखी बांधते, आणि भाऊ बहिणीचं रक्षण करण्याचं वचन देतो. भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग आणि भारतीय क्रिकेट संघात असलेल्या रोहित शर्माच्या पत्नीला आपली बहिण मानतो. एका कार्यक्रमात रोहित-रितिकाच्या लग्नाआधी युवराजने रोहितला जवळ बोलवून रितिकापासुन दूर राहण्यासाठी धमकीवजा इशारा दिला होता.

युवराज आणि रितिकाची भेट एका क्रिकेट सामन्यादरम्यान झाली होती. तेव्हा रितिका सजदेह ही क्रीडा व्यवस्थापक म्हणून काम करत होती. युवराजची रितिकासोबत अनेकदा कामानिमित्त भेटत होत असे. त्यामुळे त्यांची ओळख पुढे घट्ट होत गेली. युवराज तिला आपुलकीने बहिण म्हणून हाक मारत असे, त्याचबरोबर तिची काळजीही घेत असे. तेव्हापासुन रितिकाने युवराजला रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधायला सुरूवात केली.

युवराजनेच माझी रितिकासोबत ओळख करून दिली होती. रितिका आणि युवराज एकदा प्रमोशनल शुटसाठी भेटले होते, त्यावेळी मीही त्या ठिकाणी हजर होतो. तेव्हा युवराजने मला त्याच्याजवळ बोलावलं अन् मला म्हणाला, ती माझी बहिण आहे, तिच्यापासुन दूर रहा, तेव्हा मला युवराजनं रितिकापासुन दूर राहण्याची तंबी दिल्याचं रोहित शर्मा म्हणाला.

दरम्यान, मुंबईतील बोरीवली स्पोर्ट् क्लबमध्ये रितिकाला रोहितने प्रपोज केलं होतं. त्यांनतर रोहितच्या प्रेमाचा हा प्रस्ताव रितिकाने लगेचच स्वीकारला. मग 13 डिसेंबर 2015 मध्ये रोहितने रितिकासोबत लग्न केलं. तेव्हा युवराज हा रितिकाचा मोठा भाऊ म्हणून लग्नाला उपस्थित राहिला होता.

थोडक्यात बातम्या- 

“भाजप लोकांच्या आरोग्याशी खेळत आहे, राणेंना प्रसिद्धीचा मोह”

उद्धव ठाकरेंचे पीए मिलिंद नार्वेकरांना मोठा धक्का, बंगला तोडण्याचं काम सुरु!

भाजप प्रवेशासाठी राणेंनी दिलेल्या खुल्या ऑफरवर एकनाथ शिंदेंनी सोडलं मौन; म्हणाले…

“श्रीरामाचा भक्त येतोय, श्रीरामांनी त्यांना चरणापाशी जागा द्यावी”

“रावसाहेब दानवे यांची बुद्धी भ्रष्ट, मोदींना बैल म्हणणं हा पंतप्रधानपदाचा अपमान”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More