युवराज म्हणतो, संघात माझी जागा अजूनही कोणाला घेता आली नाही!

नवी दिल्ली | सेमी फायनलमध्ये अवघ्या 18 धावांनी भारत स्पर्धेबाहेर झाला. त्यानंतर संघाच्या निवडीवर आणि विराटच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजीवर निवड समितीने लक्ष दिलं नसल्याची खंत माजी क्रिकेटपटू युवराजसिंगनं बोलून दाखवली.

भारताला चौथ्या क्रमांकाचा चांगला फलंदाज शोधण्यात यश आलेलं नाही, असं युवराजनं म्हटलं आहे. संघाला अजूनही युवराज सिंगला पर्याय शोधता आलेला नाही, असं म्हणत त्याने निवड समितीला दोषी ठरवलं आहे.

चौथ्या क्रमांकाच्या खेळीसाठी आधी रायडूला खेळवलं गेलं, नंतर रिषभ पंतला संधी दिली आणि त्यानंतर दिनेश कार्तिकला ट्राय केलं. जर कुणी चांगलं खेळत असेल तर त्याला पाठिंबा दिला पाहिजे, असंही युवराज म्हणाला.

दरम्यान, टी- 20 वर्ल्डकप 2007 आणि वर्ल्डकप 2011 मध्ये युवराज सिंग चौथ्या क्रमांकावर खेळला होता. भारताच्या यशात युवराज मोठा वाटा होता.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

धोनीच्या भाजप प्रवेशाबाबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणतात…

-आजीबाईने मारली बुमराहची स्टाईल; त्यावर तो म्हणतो…

-काँग्रेसची साडेसाती संपता संपेना; ‘या’ बड्या नेत्याने दिला राजीनामा

-विधानसभेबाबत एमआयएमने उचललं मोठं पाऊल

-काँग्रेसमध्ये खांदेपालट होताच हालचालींना वेग; थोरातांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Loading...